आपत्कालीन निधी मराठी । Emergency Fund in Marathi । इमर्जंन्सी फंड

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

या लेखापासून आपण वैयक्तिक अर्थव्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत.

या लेखात आपण आपत्कालीन निधी म्हणजे काय ते अगदी सविस्तर समजून घेणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

आपत्कालीन निधी म्हणजे काय? । What is an Emergency Fund ?

मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या पुस्तकात पुढील पानावर काय लिहिले आहे ते काळालाच माहित तेव्हा चांगल्या-वाईट गोष्टींसाठी तयार असणे शहाणपणाचे ठरते.

पगारातील कट ऑफ, आजारपण, कारचा अपघात, कोरोना अशा आपत्कालीन परिस्थितींशी लढण्यासाठी बाजूला ठेवलेल्या विशिष्ट रक्कमेला आपत्कालीन निधी म्हणतात.

आपत्कालीन निधी हा आपल्या आर्थिक नियोजनात अडथळा आणू शकणार्‍या अनपेक्षित घटनांशी लढा देण्यासाठीची तजवीज होय.

आपल्याकडे आपत्कालीन निधी का असावा? । Why we should have an Emergency Fund?

तयार राहणे हा अर्धा विजय आहे.

कोरोना महामारीने आपत्कालीन निधी असण्याचे किती महत्त्व आहे याची जाणीव आपल्या सर्वांना करून दिलेलीच आहे.

कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

अनेक लोक संकटानंतर आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी धडपडत आहेत आणि अशा परिस्थितीत आपत्कालीन निधी खूप उपयुक्त ठरतो.

जंक फूड, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत व आम्हाला केव्हाही हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते.

याशिवाय घरात म्हातारी माणसे असतील तर आपण संकटकालीन परिस्थितीसाठी तयार असणे आवश्यक आहे.

लहान मुलांसाठीही हिच गोष्ट लागू होते कारण त्यांना खूप काळजीची गरज असते.

काही गृहोपयोगी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी देखील बराच खर्च लागतो.

जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील तर त्यांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

इमर्जन्सी फंड असणे कार प्रॉब्लेम, मेडिकल इमर्जन्सी आणि किरकोळ अनपेक्षित घटनांमध्ये खूप उपयोगी पडतो.

जर तुम्ही विचार केला तर या सर्व गोष्टी अप्रत्याशित आहेत आणि त्यांना अचानक खर्चाची आवश्यकता असते.

अशा घटनांशी लढण्यासाठी एक ठराविक निधी असणे गरजेचे आहे म्हणून आपत्कालीन निधी तयार करणे हा वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या प्राथमिक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे.

आपत्कालीन निधीचे फायदे काय आहेत? । What are the benefits of Emergency Funds?

कर्जाची गरज नाही
आपल्याकडे आपत्कालीन निधी असल्यास आपल्याला कर्ज घेण्याची गरज नाही.

अशी कर्जे अजिबात फायद्याची नसतात शिवाय व्याज ,प्रक्रिया शुल्क भरावे लागते ते वेगळे.

याशिवाय, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच त्रासातून जावे लागते.

मनःशांती
इमर्जन्सी फंड असल्यास आपण काळजी न करता झोपू शकतो आणि प्रतिकूल परिस्थिती देखील आपण शांत राहू शकतो.

आत्मसन्मान
‘जेव्हा चांगला वेळ असेल तेव्हा वाईट वेळेसाठी स्वतःला तयार करा.’

तुम्हाला इतर लोकांकडून मदत घ्यावी लागणार नाही किंवा मदत नाकारल्यामुळे होणाऱ्या अपमानाचा सामना करावा लागणार नाही. वाईट वेळी लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा खूप त्रास होतो.

आपत्कालीन परिस्थितीत निधीची पुरेशी उपलब्धता.
आपत्कालीन निधी पुरेश्या निधीची उपलब्धता सुनिश्चित करतो कारण तो आवश्यकतेच्या आधारावर ठरवला जातो.

संधीचा फायदा घ्या
अनपेक्षित संधीचा फायदा मिळवण्यासाठी काही वेळा आपत्कालीन निधी अतिशय कामी येतो.

उदा आपल्याला एखादी जुनी बाईक, जुना कॉम्प्युटर, जुना फोन इ. सवलतीत मिळत असेल तर आपण इमर्जन्सी फंड वापरू शकतो.

इमर्जन्सी फंड अशा गुंतवणुकीसाठी वापरण्यासाठी समर्पित नसला तरीही काही वेळा संधी घेणे खूप फायदेशीर ठरते.

आपत्कालीन निधी इतर कारणांसाठी वारंवार वापरू नये कारण तो गुंतवणुकीसाठी किंवा निरर्थक खर्चासाठी वापरायचे नसतात आणि शक्य तितक्या लवकर वापरानंतर परत जमा करणे अपेक्षित असते.

आपल्या आपत्कालीन निधीमध्ये किती पैसे असावेत?

अनेक तद्द आपल्याकडे किमान आपला ६ महिन्याचा आवश्यक खर्च भागेल एवढा आपत्कालीन निधी ठेवण्याची शिफारस करतात.

जर तुमच्याकडे सुरक्षित नोकरी असेल तर ३ महिन्यांचा आपत्कालीन निधी पुरेसा असू शकतो परंतु जर तुमच्याकडे चांगली नोकरी नसेल किंवा आपण व्यावसायिक असाल तर तुम्ही किमान ६ महिन्यांचा खर्च बाजूला ठेवावा.

आणीबाणीच्या खर्चाची उदाहरणे काय आहेत? । What are examples of emergency expenses?

आपत्कालीन निधीमध्ये खालील खर्च समाविष्ट केले जाऊ शकतात:

१. वीज बिल
२.    पाणी बिल
३.    फोन आणि इंटरनेट बिले
४.    अन्न: दूध,किराणा
५.    विमा हफ्ता (इन्शुरन्स प्रिमिअम).
६     कर्ज हफ्ता (लोन इएमआय).
७.    नियमित वैद्यकीय खर्च.
८.    शैक्षणिक खर्च, शाळा आणि ट्यूशन फी.
९. घरभाडे इ

तुमचा आपत्कालीन निधी कशासाठी वापरला जावा? । What should your Emergency Fund be used for?

आपत्कालीन निधी वापरण्यासाठी आपण स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार केली पाहिजे आणि ठरलेल्या गोष्टींकरिताच हा निधी वापरला गेला पाहिजे.

 • वैद्यकीय आणीबाणी, आरोग्य समस्या किंवा आजारपण.
 • नोकरी बदलताना मधल्या काळातील दैनंदिन खर्च.
 • घराची अनियोजित देखभाल उदा. गळती छप्पर, प्लंबिंग, वीज बिघाड इ
 • कारची अनियोजित देखभाल किंवा अपघात.

आपत्कालीन निधी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? । What are the features of an Emergency Fund Plan?

 • निधीची पुरेशी उपलब्धता.
  आपत्कालीन प्रसंगी तुमच्या गरजांसाठी आपत्कालीन निधी पुरेसा असावा.
 • लिक्विडीटी.
  बाजूला ठेवलेला निधी पुरेसा लिक्विड असावा. लिक्विड म्हणजे हा निधी अशा ठिकाणी गुंतवावा कि आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकेल. जर आपण बँक खात्यात किंवा लिक्विड फंडामध्ये निधी ठेवला तर तो इंटरनेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंट पद्धतींद्वारे सहज उपलब्ध होऊ शकतो.
 • योग्य परतावा.
  आपत्कालीन निधीवर महागाईच्या तूलनेत योग्य परतावा मिळावा अशी व्यवस्था. ज्या ठिकाणी परतावा मिळू शकेल अशा ठिकाणी निधी ठेवला नाही, तर महागाई झपाट्याने वाढत असल्याने निधी निरुपयोगी होईल.

आपत्कालीन निधी ठेवण्यासाठी खालील काही पर्याय आहेत.

 • बचत खाते(सेव्हिंग अकाउंट ).
 • मुदत ठेव खाते (फिक्स्ड डिपॉझिट).
 • आवर्ती ठेव खाते.
 • लिक्विड फंड.

आपत्कालीन निधी कसा तयार कराल? । How do you build an Emergency und?

सर्व आवश्यक खर्च आणि खर्चाची यादी तयार करा.

जेवढ्या कालावधीसाठी आपत्कालीन निधी तयार करणार आहोत ते नक्की करा उदा. ३ महिने, ६ महिने.

इच्छित निधी जमा करण्यासाठी लागणारा कालावधी ठरवा.

निधी पार्क करण्यासाठी साधन निवडा. उदा. बचत खाते, मुदत ठेव, लिक्विड फंड.

आपल्याला आपला फंड वेळेनुसार अपडेट करत राहण्याची देखील गरज आहे, जसे की जर कुटुंबात कोणी लहान मूल वाढणार असेल तर मासिक खर्च वाढतो , मुलांच्या शाळा सुरु झाल्या कि खर्च वाढतो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नियमित दवाखाण्याची गरज भासू लागली तर खर्च वाढतो त्यानुसार आपल्याला आपला फंड अपडेट करत राहणे गरजेचे आहे.

आपल्याला पैशाच्या व्यवस्थापना विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

आपण वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment