अटल पेन्शन योजना मराठी । Atal Pension Yojana in Marathi

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखात अटल पेन्शन योजना या अतिशय उपयुक्त योजनेची तपशीलवार माहिती बघणार आहोत.

आर्थिक नियोजनात निवृत्ती नंतर किंवा आपल्या उतार वयात खर्चाची तजवीज करण्याला खूप महत्व आहे.

आपल्यापैकी कोणीही अगदी शेवटपर्यंत काम करू शकणार नाही तेव्हा उत्तर वयात व्यवस्थित जगण्यासाठी खर्चाची तजवीज करणे गरजेचे आहे.

अटल पेन्शन योजना काय आहे ? । What is Atal Pension Yojana ?

अटल पेन्शन हि वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन देणारी सरकारी योजना आहे.

अटल पेन्शन योजनेत आपल्याला १०००, २०००, ३०००, ४००० किंवा ५००० अशा प्रकारची मासिक पेन्शन मिळू शकते.

अटल पेन्शन योजनासाठी पात्रता । Eligibility for Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजनेसाठी अर्जदाराला खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

१ ) अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
२ ) अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असणे आवश्यक आहे. ४० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
३ ) अर्जदाराने कमीतकमी २० वर्षे योजनेचा हफ्ता देणे आवश्यक आहे.
४ ) अर्जदाराकडे ठरवून दिलेल्या बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
५ ) अर्जदाराकडे वैध मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
६ ) जे स्वावलंबन योजनेचा लाभ घेत आहेत ते आपोआपच अटल पेन्शन योजनेस पात्र आहेत.

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी मासिक हफ्ता ।

अटल पेन्शन योजनेचा हफ्ता अर्जदाराचे वय आणि इच्छित पेन्शन या दोन गोष्टींवर अवलंबून आहे.

खाली मी हफ्त्याचा तपशील देत आहे.

खाली महिना १००० पेन्शन हवी असल्यास किती हफ्ता जमा करावा लागेल त्याची माहिती दिली आहे.

वय मासिक रक्कम गुंतवणुकीची वर्षे
१८४२४२
१९४६४१
२०५०४०
२१५४३९
२२५९३८
२३६४३७
२४७०३६
२५७६३५
२६८२३४
२७९०३३
२८९७३२
२९१०६३१
३०११६३०
३११२६२९
३२१३८२८
३३१५१२७
३४१६५२६
३५१८१२५
३६१९८२४
३७२१८२३
३८२४०२२
३९२६४२१

खाली महिना २००० पेन्शन हवी असल्यास किती हफ्ता जमा करावा लागेल त्याची माहिती दिली आहे.

वय मासिक रक्कम गुंतवणुकीची वर्षे
१८८४४२
१९९२४१
२०१००४०
२११०८३९
२२११७३८
२३१२७३७
२४१३९३६
२५१५१३५
२६१६४३४
२७१७८३३
२८१९४३२
२९२१२३१
३०२३१३०
३१२५२२९
३२२७६२८
३३३०२२७
३४३३०२६
३५३६२२५
३६३९६२४
३७४३६२३
३८४८०२२
३९५२८२१

खाली महिना ३००० पेन्शन हवी असल्यास किती हफ्ता जमा करावा लागेल त्याची माहिती दिली आहे.

वय मासिक रक्कम गुंतवणुकीची वर्षे
१८१२६४२
१९१३८४१
२०१५०४०
२११६२३९
२२१७७३८
२३१९२३७
२४२०८३६
२५२२६३५
२६२४६३४
२७२६८३३
२८२९२३२
२९३१८३१
३०३४७३०
३१३७९२९
३२४१४२८
३३४५३२७
३४४९५२६
३५५४३२५
३६५९४२४
३७६५४२३
३८७२०२२
३९७९२२१

खाली महिना ४००० पेन्शन हवी असल्यास किती हफ्ता जमा करावा लागेल त्याची माहिती दिली आहे.

वय मासिक रक्कम गुंतवणुकीची वर्षे
१८१६८४२
१९१८३४१
२०१९८४०
२१२१५३९
२२२३४३८
२३२५४३७
२४२७७३६
२५३०१३५
२६३२७३४
२७३५६३३
२८३८८३२
२९४२३३१
३०४६२३०
३१५०४२९
३२५५१२८
३३६०२२७
३४६५९२६
३५७२२२५
३६७९२२४
३७८७०२३
३८९५७२२
३९१०५४२१

खाली महिना ५००० पेन्शन हवी असल्यास किती हफ्ता जमा करावा लागेल त्याची माहिती दिली आहे.

वय मासिक रक्कम गुंतवणुकीची वर्षे
१८२१०४२
१९२२८४१
२०२४८४०
२१२६९३९
२२२९२३८
२३३१८३७
२४३४६३६
२५३७६३५
२६४०९३४
२७४४६३३
२८४८५३२
२९५२९३१
३०५७७३०
३१६३०२९
३२६८९२८
३३७५२२७
३४८२४२६
३५९०२२५
३६९९०२४
३७१०८७२३
३८११९६२२
३९१३१८२१

उशिरा हफ्ता जमा केल्यास दंड | Penalty for delayed premium

अटल पेन्शन योजनेत सदस्यांना त्यांचा मासिक हफ्ता बँकेत जमा करण्याची सुविधा आहे.

बँकेत हफ्ता जमा करण्यास उशीर झाल्यास दंड आकारला जाईल.

दंडाची रक्कम रक्कम १ रुपया ते १० रुपये प्रती महिना असू शकते.

  • एक रुपया प्रति महिना १०० रुपये मासिक वर्गणी साठी
  • दोन रुपया प्रति महिना १०१ ते ५०० रुपये मासिक वर्गणी साठी
  • पाच रुपये प्रति महिना ५०१ ते १००० रुपये मासिक वर्गणी साठी
  • दहा रुपये प्रति महिना १००१ किंवा त्यावरील रुपये मासिक वर्गणी साठी

अशा प्रकारे बेरीज केलेली ठराविक रक्कम / दंडाची रक्कम एकत्रित जमा रकमेतून वजा केली जाईल.

हफ्ता जमा करण्याचे बंद झाल्यावर खालील पैकी एक होऊ शकते.

  • सहा महिन्यानंतर खाते गोठवण्यात येईल.
  • बारा महिन्यानंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल.
  • चोवीस महिन्यानंतर खाते बंद होईल.

योजनेतून बाहेर पडणे किंवा पेन्शन घेणे । Exit from Atal Pension Yojana

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर अर्जदार संबंधित बँकेत अर्ज करू निवृत्ती वेतनाची मागणी करू शकता.

या योजनेतून ६० वर्षे पूर्ण होण्याआधी फक्त अपवादात्मक परिस्थितीच बाहेर पडणे शक्य आहे जसे कि अर्जदाराचा अकस्मात मृत्यू.

जर सदस्याचे अकाली निधन झाले तर, डिफॉल्ट नॉमिनी असलेल्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी)मासिक पेन्शनची ठरलेली रक्कम दिली जाईल.

सदस्य किंवा पती/पत्नी या दोघांचेही निधन झाल्यास इतर कोणताही नॉमिनी पेन्शनची रक्कम प्राप्त करण्यास पात्र असेल.

वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी योजनेतून बाहेर पडता येणे शक्य आहे अशावेळी लाभार्थी व्यक्तीला जॅम झालेली रक्कम आणि परतावा मिळू शकेल.

जर पती नंतर पत्नीने योजना सुरू न ठेवण्याची निवड केली तर, एपीवाय खात्यात जमा झालेला संपूर्ण निधी जोडीदाराला किंवा नॉमिनीला परत केला जाईल.

आपल्याला पैशाच्या व्यवस्थापना विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

अशीच माहिती मिळवण्याची पैसा झाला मोठाच्या लिंकला बुकमार्क करायला विसरू नका.

आपण वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment