नमस्कार मित्रांनो,
‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपलं सहर्ष स्वागत आहे.
या लेखात आपण शेअर मार्केट माहिती या कॅटेगरी अंतर्गत शेअरची फेस व्हॅल्यू किंवा शेअरची फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी किंमत म्हणजे काय ते समजून घेणार आहोत तसेच फेस व्हॅल्यू कशी ठरवली जाते आणि फेस व्हॅल्यूची गरज काय असते अशी सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया.
शेअरची फेस व्हॅल्यूलाच आपण दर्शनी किंमत, दर्शनी मूल्य, नॉमिनल व्हॅल्यू असे देखील म्हणू शकतो.
फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीच्या शेअरची मूळ किंमत होय.
शेअरची फेस व्हॅल्यू आपल्याला शेअर सर्टिफिकेटवर बघायला मिळते.
खाली मी टाटा केमिकल्स ली. कंपनीचे शेअर सर्टिफिकेट देत आहे.
सर्टिफिकेटवर मी शेअरची फेस व्हॅल्यू पिवळ्या रंगाने हायलाइट करून दाखवली आहे.
आपण बघू शकतो कि टाटा केमिकल्स शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये इतकी आहे.
शेअरची फेस व्हॅल्यू कधीही बदलत नाही ती नेहमी स्थिर असते.
अपवाद : कंपनीने शेअर स्प्लिट करायचे ठरवल्यास शेअरची फेस व्हॅल्यू चेन्ज होते.
शेअर स्प्लिटची संपूर्ण माहिती आपण नवीन लेखात बघणार आहोत.
फेस व्हॅल्यू कशी ठरवतात ?
कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू हि एक कायदेशीर किंमत असते.
कंपनी शेअरची फेस व्हॅल्यू कंपनीचे संस्थापक किंवा प्रमोटर्स ठरवतात.
उदा. आपण असे समजूया कि ५ लोकांनी मिळून टाटा कंपनीची स्थापना केली टाटा पब्लिक लिमिटेड.
कंपनी चालू करण्यासाठी प्रत्येकाने २०,००० रुपयांप्रमाणे भांडवल दिले आणि एकूण १,००,००० रुपये भांडवलात कंपनी उभी राहिली.
आता भांडवलदारांनी कंपनीचे शेअर्स आपापसांत वाटून घेण्याचे ठरवले आणि कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये इतकी ठरली.
१० रुपये किमतीप्रमाणे १,००,००० रुपयांचे एकूण १०,००० शेअर्स तयार होतील आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला टाटा पब्लिक लिमिटेड कंपनीचे २,००० शेअर्स मिळतील.
सेबीच्या नियमानुसार कंपनीची फेस व्हॅल्यू कमीत कमी १ रुपये असणे आवश्यक आहे.
फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू
फेस व्हॅल्यू म्हणजे काय ते आपण बघितले आता आपण मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय ते बघूया.
मार्केट व्हॅल्यू म्हणजे कंपनीच्या शेअरची मार्केटमधील आजची प्राइस होय.
फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू वेगवेगळ्या असू शकतात का ?
उत्तर आहे हो. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू वेगवेगळ्या असू शकतात.
उदा. टाटा केमिकल्स कंपनीची मार्केट प्राइस ७ नोव्हेंबर २०२१ रोजी ९०५.५० आहे तर फेस प्राइस आहे १० रुपये.
हे कसे घडते ते आपण बघूया.
कंपनी भांडवल उभारण्यासाठी आपले शेअर्स विक्रीस काढते ज्याला आपण आयपीओ म्हणतो.
आपण मार्केटमध्ये येणारे आयपीओ बघितल्यास आपल्या असे लक्षात येते कि आयपीओची इश्यू प्राइस फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असते.
मित्रांनो, आयपीओसाठी आपण शेअरच्या फेसव्हॅल्यू पेक्षा जी जास्त किंमत मोजतो त्याला शेअर मार्केटच्या भाषेत प्रिमिअम म्हणतात.
उदा. टाटा केमिकल्स आयपीओ कंपनी २५ रुपये प्रति शेअर किमतीला इश्यू करू शकते.
म्हणजे मूळ किमतीपेक्षा आपण १५ रुपये जास्त देत आहोत.
आपण विचार करत असाल कि आपण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे किंवा प्रिमिअम का द्यायचा असतो.
मित्रांनो, आपण भांडवलदार किंवा गुंतवणूकदार म्हणून कंपनीत उशिरा सहभागी होत असतो आणि आता कंपनीचा उद्योग चांगल्यापैकी स्थापित झाला आहे तेव्हा आपला गुंतवणूक करण्यातील धोका कमी आहे.
शिवाय आपल्या गुंतवणुकीची किंमत वाढण्याची शक्यता आता अधिक चांगली आहे म्हणून आपण गुंतवणूक करतांना जास्तीची किंमत देत असतो.
अशाप्रकारे कंपनीचा आयपीओ येतो आणि कंपनी स्टॉक एकचेन्जमध्ये लिस्ट होते.
कंपनीचा उद्योग, ब्रॅण्ड, व्यावस्थापन थोडक्यात काय तर कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असल्यास कंपनीच्या शेअरला मार्केटमध्ये चांगली मागणी असते.
मागणी वाढली कि किंमत वाढते हा नियम आपल्याला माहीतच असेल आणि अशाप्रकारे कंपनीच्या शेअरची किंमत वाढत जाते.
कंपनीचा शेअर स्टॉक एक्स्चेंजमध्ये ज्या किमतीला ट्रेड होतो त्या किमतीला स्टॉकची मार्केट प्राइस, मार्केट व्हॅल्यू असे म्हणतात.
कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूवर मार्केटमधील परिस्थितीचा परिणाम होतो तर फेस व्हॅल्यूवर मार्केटच्या परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही.
त्यामुळे कंपनीची फेस व्हॅल्यू स्थिर असते तर मार्केट व्हॅल्यू नेहमी कमी-जास्त होत असते.
फेस व्हॅल्यूचा उपयोग कशासाठी होतो ?
१. लाभांश /डिव्हिडंड
अनेकदा आपण विविध कंपन्यांनी २००% , १००% डिव्हिडंड जाहीर केल्याच्या बातम्या ऐकत असतो.
कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला हा जो डिव्हिडंड देते तो कंपनीच्या शेअरच्या फेस व्हॅल्यूवर दिला जातो.
उदा. टाटा केमिकल्स कंपनीने २००% डिव्हिडंड जाहीर केल्यास आणि टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये असल्याने शेअर होल्डर्सला प्रत्येक शेअरमागे २० रुपये मिळतील.
२. शेअर स्प्लिट /विभाजन
कंपनी आपल्या शेअरचे जेव्हा विभाजन करते त्यावेळी प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू कमी होते.
शेअरच्या विभाजन करण्याला शेअर मार्केटमध्ये शेअर स्प्लिट म्हणतात.
उदा. टाटा केमिकल्स कंपनीने शेअर स्प्लिटची घोषणा केल्यास आणि स्प्लिटचे प्रमाण १:१ जाहीर केल्यास.
टाटा केमिकल्स शेअरची मूळ फेस व्हॅल्यू जी १० रुपये होती ती आता ५ रुपये इतकी होईल.
शेअर स्प्लिट होताना शेअरची किंमत जरी अर्धी होत असली तरी शेअरची संख्या त्याच पटीत वाढवली जाते जेणेकरून आपली कंपनीतील गुंतवणूक आहे तेवढीच राहते.
उदा. आपल्याकडे टाटा केमिकल्स कंपनीचे १०० शेअर्स आहेत ज्यांची फेस व्हॅल्यू १० रुपये होती मात्र स्टॉक स्प्लिट नंतर ५ रुपये झाली तर आपल्याकडील शेअर्सची संख्या आता आपोआप २०० शेअर्स इतकी होईल.
म्हणजे आपली गुंतवणूक जी १०० x १०=१००० होती ती आत्ता सुद्धा २०० x ५ =१००० तेव्हढीच राहते.
अशाप्रकारे आपण शेअर मार्केटमधील फेस व्हॅल्यू विषयी अतिशय खोलवर चर्चा केली.
आपल्या ज्ञानात हा लेख वाचून भर पडली असेल अशी अपेक्षा करतो आपल्याला लेखाविषयी काहीही शंका असल्यास आपण कमेंट करून विचारू शकतात.
आपल्या सूचनां-सुधारणांचे देखील मी स्वागत करतो.
शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा.
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद !!!
- शेअर मार्केटचा इतिहास मराठी |Share Market in Marathi
- भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi
- सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?
- आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?
- डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? मराठी | What is Demat Account in Marathi?
- मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi
- शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi
- अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi
- फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi
- ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi
- स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi
- रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi
- डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi
- बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi
- गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi ?