नमस्कार मित्रांनो!!!
पैसा झाला मोठाच्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.
आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये काम करायचे असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउन्ट आणि ट्रेडिंग अकाउन्ट असणे गरजेचे आहे.
आपण या लेखात डिमॅट अकाउन्ट विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया
डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? | What is Demat Account?
डिमॅट हा एक इंग्रजी शब्द असून तो डिमटेरालाईज्ड या शब्दाचा संक्षेप आहे. डिमटेरालाईज्ड म्हणजे ज्याला कोणतेही भौतिक अस्तित्व नाही असे.
पूर्वीच्या काळी शेअर्सची खरेदी हि कागदावरील कराराच्या स्वरूपात होत असे. अशाप्रकारे शेअर्सची देवाण-घेवाण करणे अतिशय गैरसोयीचे होते म्हणूनच मग डिमॅट खात्याची सुरुवात झाली.
डिमॅट खात्यात शेअर्स इलेकट्रॉनिक पद्धतीने साठवले जातात.
हे अगदी बँक खात्यात पैसे साठवल्याप्रमाणे आहे.
उदा. आपण बँकेत बचत खाते सुरु करतो आणि त्यात आपले पैसे टाकतो.
आपण जर बँकेचे पासबुक भरले किंवा बँकेचे खाते मोबाईल वर उघडून पहिले तर आपल्याला त्यात आपले पैसे दिसून येतात.
डिमॅट अकाउन्ट अगदी बँक खात्याप्रमाणेच आहे आपण जे शेअर्स खरेदी करतो ते आपल्या डिमॅट अकाउण्ट मध्ये साठवले जातात तर आपण आपले शेअर्स विक्री केले तर तेवढे शेअर्स डिमॅट अकाउंट मधून वजा होतात.
आपण आज घरबसल्या आपल्या मोबाईलवर आणि कॉम्पुटरवर शेअर्सची जी खरेदी-विक्री करतो ती डिमॅट अकाउन्ट आणि ट्रेडींग अकाउन्टच्या मदतीनेच करत असतो.
डिमॅट अकाउन्ट मध्ये शेअर्स, बॉंड्स, डिबेंचर्स, सरकारी रोखे इ गोष्टी होल्डिंग म्हणून ठेवल्या जातात.
डिमॅट प्रणालीची सुरुवात कधी झाली ?
भारतात १९९६च्या डिपॉझिटरी कायद्यानुसार शेअर्स विकत घेणे, शेअर्स विकणे आणि शेअर्स हस्तांतरित करणे खूप सोपे झाले आणि शेअर प्रमाणपत्राशी संबंधित अनेक धोकेही टाळता येणे शक्य झाले आहे.
आपल्याकडे १९९६ पासून राष्ट्रीय शेअर बाजारात ( एनएसइ )डिमॅटने व्यवहार सुरु झाले आणि पेपरलेस ट्रेडींगचा शुभारंभ झाला.
आज भारतीय शेअर बाजार या प्रगत तंत्रज्ञानामुळेच जगातील सर्वात वेगवान शेअर बाजारांपैकी एक बाजार बनला आहे.
डिमॅट अकाउन्टचे फायदे कोणते ?
१. कमी धोका
पूर्वीच्या काळी शेअर होल्डरला कागदी सर्टिफिकेट दिले जाई. शेअरचे सर्टिफिकेट जपून ठेवणे गरजेचे असते आणि त्यात बरेच धोके असतात, तुलनेने डिजिटल शेअर सांभाळण्यासाठी काहीही करण्याची गरज नसते. अर्थातच कागदी सर्टिफिकेट गहाळ होण्याचा धोका असतो. याशिवाय कागद खराब होण्याचा किंवा कागदावरील शाई खराब होण्याची देखील शक्यता असते.
२. कर्जाची सुविधा
तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजद्वारे बँकेतून कर्ज मिळवू शकतात. आपण सिक्युरिटीज किंवा शेअर्स बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून गहाण ठेवू शकतो.
३. कमी खर्च
डिमॅट अकाउन्ट मधील शेअर्स आणि सिक्युरिटीजची देवाण-घेवाण भौतिक शेअर्स आणि सिक्युरिटीजच्या हस्तांतरणापेक्षा खूप कमी खर्चिक असते.
४. कमी वेळ
डिमॅट खाते वापरून शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्याची प्रक्रिया त्वरित आहे. याउलट जर भौतिक प्रमाणपत्रे असतील तर बराच वेळ लागू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे सिक्युरिटीज डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात साठवले जातात. आपण अगदी एका क्लिकवर शेअर्स खरेदी करू शकतो तर एका क्लिकवर शेअर्स विक्री करू शकतो.
५. सुलभ कामकाज
ट्रेडींग करताना आपल्याला आपल्या व्यावहाराच्या सर्व नोंदी ठेवणे गरजेचे असते आपल्याकडे डीमॅट अकाउन्ट असल्यास सर्व गोष्टी जतन करणे अगदी सोपे होते. सर्व गुंतवणुकीच्या नोंदीसह आपण आपली सर्व कागदपत्रे सुरक्षितपणे ठेवू शकतो. अशाप्रकारे डिमॅट अकाउन्टमुळे आपले कामकाज अतिशय सुलभ होते.
६. कर सवलत
डिमॅट खात्याद्वारे केलेल्या व्यवहारांना सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) कर कपातीतून सवलत दिली आहे. याशिवाय आपल्या बॉण्ड्स आणि सिक्युरिटीजवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टीडीएस कापला जात नाही.
डिमॅट अकाउन्ट कुठे उघडता येते ?
आपल्याकडे मुख्य दोन डिपॉझिटरी आहेत
- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (National Securities Depository Limited (NSDL))
- सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (Central Depository Services Limited (CSDL))
सर्व डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट या दोन्ही पैकी एका डिपॉझिटरीसोबत सलग्न असतात.
या दोन्ही डिपॉझिटरी नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज आणि बाँबे स्टॉक एक्सचेन्ज सोबत अगदी सुव्यवस्थितपणे जोडल्या गेल्या आहेत
डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट या एनएसडीएल (NSDL) किंवा सीएसडीएल (CSDL) च्या वतीने या सिक्युरिटीज ठेवतात आणि प्रशासित करतात आणि अशा प्रकारे डीमॅट सिक्युरिटीज सुरक्षित असतात.
डिमॅट अकाउन्ट सुरक्षित आहेत का?
दोन्ही डिपॉझिटरीमध्ये ठेवलेल्या सिक्युरिटीजचे आणि शेअर्सचे नियमन सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे केले जाते.
सेबीच्या नियमांतर्गत पीओए (पॉवर ऑफ अटर्नी ) निकषांचे मानकीकरण केल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी आहे.
सेबीच्या मार्गदर्शकतत्त्वांमुळे ब्रोकरचे अधिकार प्रतिबंधित केले गेले असून फक्त सेटलमेण्ट आणि निधी ट्रान्सफर पुरतेच मर्यादित केले गेले आहेत
या सर्व गोष्टींमुळे डिमॅट अकाउन्ट सुरक्षित असल्याचे आपण म्हणू शकतो.
सुधारित नियमांनुसार, कोणताही ब्रोकर आपल्या लेखी संमतीशिवाय मार्केटच्या बाहेर म्हणजेच ऑफ-मार्केट व्यवहार करू शकत नाही किंवा सिक्युरिटीज हस्तांतरित करू शकत नाहीत.
याशिवाय डिमॅट अकाउन्ट, डिमॅट शेअर्स आणि ऑनलाइन व्यवहार तपासणे सोपे झाल्याने कोणताही घोटाळा लगेच उघडकीस येऊ शकतो.
पीओए (पॉवर ऑफ अटर्नी ) म्हणजे काय ?
पीओए (पॉवर ऑफ अटर्नी ) म्हणजे अधिकारपत्र होय.
आजकाल सर्वच ब्रोकरकडे अकाउन्ट सुरु करतेवेळी ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर्स पीओए देखील स्वाक्षरी करून जमा करतात किंबहुना तो एक खाते सुरु करण्याचाच भाग झाला आहे.
(पीओए) हा कायदेशीर दस्तऐवज असून तो आपल्या ब्रोकरला दस्तऐवजातील मान्य अटींनुसार आपले डीमॅट खाते चालवण्याचा मर्यादित किंवा पूर्ण कायदेशीर अधिकार देतो
पीओए हे पूर्णपणे ऐच्छिक असून आपल्याला नको असल्यास आपण पीओए नाही दिले तरी डिमॅट अकाउन्ट ओपन करू शकतो.
पीओए विषयी येणाऱ्या लेखात आपण अजून जास्त खोलवर चर्चा करणार आहोत.
आपण आपले डिमॅट अकाउन्ट कसे सुरक्षित ठेवू शकतो ?
- आपण आपले लॉगिन क्रेडेन्शियल, म्हणजे युजरनेम, पासवर्ड, आणि खात्यासंबंधी सर्व गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजे.
- आपला ई-मेल आणि मोबाईल क्रमांक नियमितपणे डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP)कडे अपडेट केला जात असल्याची खात्री करा.
- डिमॅट खात्याशी संबंधित मेसेज आणि अलर्ट काळजीपूर्वक वाचा जेणेकरून कोणताही गोंधळ आपल्या त्वरित लक्षात येईल.
- आपले खाते अधून-मधून चेक करत रहा.
- आपल्या ट्रेडींग अकाउन्टमध्ये गरजेपुरतीच रक्कम असू द्या.
- आपल्याला खात्यासंबधी शंका उपस्थित झाल्यास आपण डीपीला आपले खाते फ्रिज करण्याची विनंती करू शकतो.
डिमॅट अकाउन्टसाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
डिमॅट खाते सुरु करण्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे तीन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
१. ओळखपत्र
- पॅन कार्ड
- आधारकार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
२. रहिवासाचा पुरावा
- आधारकार्ड
- वीजबिल
- फोनबिल (लॅण्डलाइन )
- मतदार ओळखपत्र
३. उत्पन्नाचा पुरावा
- आयकर (इन्कमटॅक्स रिटर्न्स)
- ३-६ महिन्यांचे बँक स्टेटमेन्ट
- कॅन्सल चेक (बॅंकेचा क्रॉस केलेला चेक)
- सॅलरी स्लिप (पगाराचा पुरावा)
याशिवाय आपल्याला २ रंगीत पासपोर्ट साइझ फोटो अकाउन्ट उघडण्यासाठी लागतात.
वर दिलेल्या कागदपत्रांपैकी प्रत्येक प्रकारचे एक कागदपत्रं आपल्याला जमा करणे अनिवार्य आहे.
आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारे डिमॅट खाते उघडता येते.
आपल्याला अकाउन्ट ऑनलाइन उघडायचे असल्यास आधारकार्ड आणि मोबाईल नंबर लिन्क असावा लागतो.
ऑनलाईन खाते उघडण्यासाठी सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यास १५ ते २० मिनिटे लागू शकतात.
ऑफलाईन खाते उघडण्यासाठी आपल्याला खाते उघडण्याचा फॉर्म आणि वर दिलेल्या कागदपत्रांच्या प्रति जमा कराव्या लागतात.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण डिमॅट अकाउन्ट विषयीच्या काही गोष्टींची माहिती घेतली.
या लेखात अजून जास्त माहिती वाढवण्याचा मी प्रयत्न करेल.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.
आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- शेअर मार्केटचा इतिहास मराठी |Share Market in Marathi
- भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi
- सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?
- आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?
- डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? मराठी | What is Demat Account in Marathi?
- मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi
- शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi
- अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi
- फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi
- ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi
- स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi
- रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi
- डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi
- बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi
- गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi