नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

Rate this post

Nuvoco Vistas Corporation IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi

मित्रांनो, येत्या आठवड्यात नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि. कंपनीचा आईपिओ येत आहे.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि. हि प्रसिद्द निरमा ब्रँड आणि नावाजलेले उदयोजक डॉ कर्सनभाई पटेल यांची कंपनी आहे

आईपिओ च्या माध्यमातून नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन जवळपास ५००० कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ असून यात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशनचा स्टॉक या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २३ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशनचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.

अनुक्रमणिका hide
Nuvoco Vistas Corporation IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Nuvoco Vistas Corporation IPO Subscription Status

खुला झाल्यानंतर नुवोको विस्‍टास आइपीओ दुसऱ्या दिवशी ०.२९ पट सबस्क्राइब झाल्याचे समजते

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)
४.३३ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)
०.६६ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
०.७३ पट

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओ शेअर्सची उपलब्धता | Availability of Nuvoco Vistas Corporation IPO Shares

एकूण ५००० कोटी रुपयांपैकी १५०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्याने विक्रीस उपलब्ध (फ्रेश इश्यू) आहे, तर ३५०० कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल ) उपलब्ध केले आहेत.

उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.

शेअर्सची उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)
५० %
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)
१५ %
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
३५ %

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओ ची किंमत आणि लॉट साईझ | Nuvoco Vistas Corporation IPO Share Price

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन शेअरची दर्शनी किंमत हि १० रुपये आहे.

या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ५६० रुपये आणि कमाल किंमत ५७० रुपये असणार आहे

एका लॉटमधील शेअरची संख्या हि २६ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २६ *  ५६०    =१४,५६० रुपये  ते २६ *   ५७० = १४,८२० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच१४,५६० रुपये  तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९२,६६० रुपये इतकी असणार आहे.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओ ची तारीख | Nuvoco Vistas Corporation IPO Release Date

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओ ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ११ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन शेअर्सची अलॉटमेंट १७ ऑगस्ट २०२१ रोजी चालू होणार असून २० ऑगस्ट २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर २३ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Nuvoco Vistas Corporation IPO

सध्या मार्केटमध्ये नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम ३५ रुपये ते ४० रुपये असल्याचे समजते

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपिओचा उद्देश | Objectives of Nuvoco Vistas Corporation IPO

  • कर्जाची परतफेड आणि आगाऊ पेमेंट करणे.
  • दैनंदिन आर्थिक व्यवहार

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन कंपनीची माहिती | Information of Nuvoco Vistas Corporation

नियोगी एन्टरप्राइझेस प्रा. लि. आणि डॉ कर्सनभाई पटेल हे नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि या कंपनीचे प्रमोटर्स आहेत

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशनचा मुख्य कार्यालयीन पत्ता :
इक्विनॉक्स बिझनेस पार्क टॉवर ३ , ४ था मजला, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई ४०००७०

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि हि निरमा ग्रुप कंपनीचा एक भाग असून भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या आणि काँक्रीट उत्पादकांपैकी एक आहे.

निरमा ग्रुपची स्थापना १९९९ साली झाली असून त्यांनी २०१४ पासून सिमेंट उत्पादन पाऊल ठेवले आहे.

उत्पादन क्षमतेनुसार नुवोको विस्‍टासचा भारतातवा क्रमांक लागतो.

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि हि सिमेंट, रेडीमिक्स कॉंक्रिट (आरएमसी), तसेच इतर बांधकाम साहित्य जसे अडेझीव्हज, वॉल पुटी, ड्राय प्लास्टर, कव्हर ब्लॉक्स यासारख्या विविध सिमेंट-काँक्रीट प्रकारच्या प्रॉडक्ट्सचे उत्पादन करते

नुवोको विस्‍टासकडे १५,९६९ डिलर्सची मोठी फौज असून वितरकांचे (डिस्ट्रिब्युटर्स) मोठे नेटवर्क आहे.

आपल्या या मोठ्या नेटवर्कद्वारे नुवोको विस्‍टास आपली उत्पादने थेट किरकोळ ग्राहक आणि मोठे खरेदीदार, विविध संस्था यांच्यापर्यंत सहज पोहचवू शकते

हे सर्व प्लॅन्ट मिळून नुवोको विस्‍टासची एकूण उत्पादन क्षमता जवळपास २२.३२ MMTPA आहे.

३१ मार्च २०२१ रोजी कंपनीकडे संपूर्ण भारतभर जवळपास ४९ आरएमसी (RMC) प्लॅन्ट देखील आहेत

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन उजवी बाजू | Positives of Nuvoco Vistas Corporation

  • नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन हि पूर्व भारतातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादन क्षमता असणारी कंपनी आहे
  • नुवोको हा सिमेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य ब्रँड आहे
  • नुवोकोचे विक्रेते आणि डीलर्स यांचे असणारे मोठे नेटवर्क हि जमेची बाजू आहे
  • अनुभवी व्यवस्थापन आणि उत्तम प्रमोटर्स (डॉ कर्सनभाई पटेल)

थोडक्यात महत्वाचे | All Important

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन आईपीओ५००० कोटी रुपये
किमान किंमत ५६०  रुपये
कमाल किंमत ५७० रुपये
लॉट साईझ  २६
एकूण गुंतवणूक १४,५६० रुपये  ते १४,८२० रुपये
आईपिओ खुला होणार९ ऑगस्ट २०२१
आईपिओ बंद होणार११ ऑगस्ट २०२१
शेअर्स इश्यू होणार१७ ऑगस्ट २०२
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार२० ऑगस्ट २०२१
नुवोको विस्‍टास शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार२३ ऑगस्ट २०२१

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात

नुवोको विस्‍टास कॉरपोरेशन लि

आणखी आईपीओ

कारट्रेड टेक, ९ ऑगस्ट २०२१, २९९८.५१ कोटी रुपये

ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लि, १० ऑगस्ट २०२१, २२८०.०५ कोटी रुपये

केमप्लास्ट सनमार, १० ऑगस्ट २०२१,  ३८५० कोटी रुपयेचला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment