देवयानी इंटरनॅशनल आईपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

Rate this post

Devyani International IPO in Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi

मित्रांनो, या लेखात आपण येत्या आठवड्यात येणाऱ्या देवयानी इंटरनॅशनल ली कंपनीच्या आई पि ओ बद्दल माहिती घेणार आहोत.

आपण इथे देवयानी इंटरनॅशनल ली कंपीनीची माहिती देखील बघणार आहोत जेणेकरून आपल्याला आई पि ओ घ्यावा कि नाही याचा निर्णय घेण्यास मदत होईल.

मित्रांनो आपल्याला केएफसी (KFC), पिझ्झा हट(Pizza Hut), कोस्टा कॉफी(Costa Coffe) या प्रसिद्ध ब्रॅंड्सची नावे माहित असतीलच.

देवयानी इंटरनॅशनल ली हि या ब्रॅंड्सची (यम) सर्वात मोठी फ्रँचाइझी आहे

देवयानी इंटरनॅशनल या आई पि ओ च्या माध्यमातून जवळपास १८३८ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे

एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी ४४० कोटी रुपयांचे शेअर्स हे नवीन असून १५.५३ कोटी (जवळपास १३९८ कोटी रुपये) शेअर्स कंपनीचे प्रमोटर्सकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत

देवयानी इंटरनॅशनलचा स्टॉक या महिन्याच्या मध्यात म्हणजेच १६ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

देवयानी इंटरनॅशनलचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे

देवयानी इंटरनॅशनल सब्सक्रिप्शन स्टेटस | Devyani International IPO Subscription Status

देवयानी इंटरनॅशनल आईपीओ खुला झाल्यानंतर अखेरच्या दिवशी ११६.७० पट सबस्क्राइब झाला

मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)
९५.२७ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)
२१३.०६ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
३९.४८ पट

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ शेअर्सची उपलब्धता | Availability of Devyani International IPO Shares

एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी ४४० कोटी रुपयांचे शेअर्स हे नवीन असून १५.५३ कोटी (जवळपास १३९८ कोटी रुपये) शेअर्स कंपनीचे प्रमोटर्सकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ ची किंमत आणि लॉट साईझ | Devyani International IPO Share Price

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ८६ रुपये आणि कमाल किंमत ९० रुपये असणार आहे

एका लॉटमधील शेअरची संख्या हि १६५ असणार आहे. याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि किमान ८६ * १६५ =१४,१९० रुपये ते कमाल ९० * १६५ = १४,८५० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा हि कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९३,०५० रुपये इतकी असणार आहे.

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ ची तारीख | Devyani International IPO Release Date

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ ४ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ६ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे दिवस आई पि ओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

देवयानी इंटरनॅशनल आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Devyani International IPO

सध्या मार्केटमध्ये देवयानी इंटरनॅशनलचे ग्रे मार्केट प्रीमियम ४४ रुपये ते ४७ रुपये असल्याचे समजते

देवयानी इंटरनॅशनल कंपनीची माहिती | Information of Devyani International IPO

देवयानी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली इथे आहे कंपनीचा कार्यालयीन पत्ता खालीलप्रमाणे आहे

Devyani International Limited, F-2/7, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi 110 020

Phone: 011 4170 6720
Email: [email protected]
Website: http://www.dil-rjcorp.com/

देवयानी इंटरनॅशनल ली या कंपनीची स्थापना १९९१ मध्ये झाली असून हि कंपनी भारतातील सर्वात मोठ्या क्विक सर्व्हिस रेस्टोरंट(QSR) चैन पैकी एक आहे.

प्रमोटर्स :

  • रवी कांत जयपुरिया
  • वरून जयपुरिया
  • आर, जे, कॉर्प ली, (RJ Corp Ltd.)

कंपनीचा विस्तार १५५ शहरांमध्ये झाला असून कंपनीची जवळपास ६५५ स्टोअर्स आहेत.

देवयानी इंटरनॅशनल कंपनीची काही स्टोअर्स नेपाळ आणि नायजेरिया मध्ये सुद्धा आहे

कंपनीचे मुख्यब्रॅण्ड्स : केएफसी (KFC), पिझ्झा हट(Pizza Hut), कोस्टा कॉफी(Costa Coffe)

कंपनीचे इतर ब्रॅण्ड्स : Vaango, Food Street, Masala Twist, Ile Bar, Amreli and Ckrussh Juice Bar

देवयानी इंटरनॅशनलची उजवी बाजू | Positives of Devyani International

  • कंपनीचा प्रॉडक्ट पोर्टफोलियो हा प्रसिद्ध ब्रॅण्ड्सपासून तयार झाला आहे.
  • ३० वर्षांपासून क्विक सर्व्हिस रेस्टोरंट क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी
  • यम ब्रॅंड्सची भारतातील सर्वात मोठी फ्रँचायझी म्हणजे देवयानी इंटरनॅशनल होय
  • कंपनीचे असणारे स्टोअर्सचे मोठे नेटवर्क हि जमेची बाजू आहे [केएफसी /KFC) = २६४, पिझ्झा हट/Pizza Hut = २९७, कोस्टा कॉफी(Costa Coffe) = ४४]

थोडक्यात महत्वाचे | All Important

देवयानी इंटरनॅशनल आईपिओ १८३८ कोटी रुपये
किमान किंमत ८६ रुपये
कमाल किंमत ९० रुपये
लॉट साईझ १६५
एकूण गुंतवणूक१४,१९० रुपये ते १४,८५० रुपये
आईपिओ खुला होणार ४ ऑगस्ट २०२१
आईपिओ बंद होणार ६ ऑगस्ट २०२१
शेअर्स इश्यू होणार११ ऑगस्ट २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १३ ऑगस्ट २०२१
शेअर लिस्ट होणार१६ ऑगस्ट २०२१
थोडक्यात महत्वाचे

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात

देवयानी इंटरनॅशनल ली.

आणखी आईपीओ

क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपीओ,  ४ ऑगस्ट २०२१, किंमत १२१३.३३ कोटी रुपये 

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment