कारट्रेड टेक आईपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

Rate this post

CarTrade Tech IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi

मित्रांनो, येत्या आठवड्यात कारट्रेड टेक लि. कंपनीचा आईपिओ येत आहे.

कारवाले, बाइकवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, ऑटोबिझ इ हे सर्व प्रसिद्ध ब्रॅण्ड्स कारट्रेड टेक या कंपनीचेच आहेत.

आईपिओ च्या माध्यमातून कारट्रेड जवळपास २९९८.५१ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

कारट्रेडचा स्टॉक या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २३ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

कारट्रेड टेकचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.

कारट्रेड टेक सब्सक्रिप्शन स्टेटस | CarTrade Tech IPO Subscription Status

खुला झाल्यानंतर कारट्रेडचा आइपीओ दुसऱ्या दिवशी ०.९९पट सबस्क्राइब झाल्याचे समजते

मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) ३५.४५ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) ४१.०० पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) २.७५ पट

कारट्रेड टेक आईपिओ शेअर्सची उपलब्धता | Availability of CarTrade Tech IPO Shares

एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी  २९९८.५१ कोटी रुपयांचे म्हणजेच १,८५,३२,२१६ शेअर्स हे कंपनीच्या प्रमोटर्सकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत.

उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.

शेअर्सची उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५०%
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५%
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५%

कारट्रेड टेक आईपिओ ची किंमत आणि लॉट साईझ | CarTrade Tech IPO Share Price

या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत १,५८५ रुपये आणि कमाल किंमत १,६१८ रुपये असणार आहे

एका लॉटमधील शेअरची संख्या हि ९ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ९ * १,५८५  =१३,९९५ रुपये  ते ९ *  १,६१८ = १४,५६२ रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८९,३०६ रुपये इतकी असणार आहे.

कारट्रेड टेक आईपिओ ची तारीख | CarTrade Tech IPO Release Date

कारट्रेड टेक आईपिओ ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ११ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आई पि ओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

कारट्रेड शेअर्सची अलॉटमेंट १७ ऑगस्ट २०२१ रोजी चालू होणार असून २० ऑगस्ट २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर २३ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

कारट्रेड टेक आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of CarTrade Tech IPO

सध्या मार्केटमध्ये कारट्रेड टेक आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम ३०० रुपये असल्याचे समजते

कारट्रेड टेक आईपिओचा उद्देश | Objectives of CarTrade Tech IPO

स्टॉक मार्केट मध्ये कंपनीचा समावेश करून, मार्केटच्या सुविधांचा लाभ घेणे

कारट्रेड टेक कंपनीची माहिती | Information of Krsnaa Diagnostics

कारट्रेड हि एक व्यावसायिक कंपनी असून तिचे कोणीही ठराविक प्रमोटर्स नाहीत.

कारट्रेड ची स्थापना २००० मध्ये झाली असून कारट्रेड नवीन आणि जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री करण्याच्या नावाजलेल्या प्लॅटफॉर्म पैकी एक नाव आहे.

कारट्रेडचे कारवाले, बाइकवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, ऑटोबिझ इ असे विविध ब्रॅण्ड्स आहेत.

कारट्रेड टेक उजवी बाजू | Positives of CarTrade Tech

  • कारट्रेड कंपनीचे बिझनेस मॉडेल अतिशय चांगले असून भविष्यात त्याला भरपूर वाव आहे
  • कारट्रेड खरेदी, विक्री, मार्केटिंग, फायनान्स अशा विविध सुविधा उपलब्ध करून देते
  • कारट्रेड वाहन उद्योगातील एक अग्रगण्य ब्रँड आहे

थोडक्यात महत्वाचे | All Important

कारट्रेड टेक आईपिओ एकूण किंमत २९९८.५१ कोटी रुपये
किमान किंमत १,५८५  रुपये
कमाल किंमत १,६१८ रुपये
लॉट साईझ
एकूण गुंतवणूक १३,९९५ रुपये  ते १४,५६२ रुपये
आईपिओ खुला होणार ९ ऑगस्ट २०२१
आईपिओ बंद होणार ११ ऑगस्ट २०२१
शेअर्स इश्यू होणार १७ ऑगस्ट २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार २० ऑगस्ट २०२१
कारट्रेड शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार २३ ऑगस्ट २०२१

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात

कारट्रेड टेक ली.

आणखी आईपीओ

देवयानी इंटरनॅशनल आईपीओ,  ४ ऑगस्ट २०२१,

क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपीओ, ४ ऑगस्ट २०२१,

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment