एलआयसी आयपीओ । LIC IPO

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

एलआयसी ही एक विमा (Insurance) कंपनी आहे जी भारतीय ग्राहकांसाठी सुरक्षा आणि गुंतवणूक अशा दोन्ही गोष्टींचे पर्याय उपलब्ध करून देते.

एलआयसी हा आपल्या सर्वांना परिचित असणारा ब्रँड आहे.

हा आयपीओ ४ मे २०२२ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी २१००८ कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एलआयसी एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

चला तर मग माहिती घेऊया आयपीओची.

एलआयसी आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | LIC IPO Subscription Status

एलआयसी आयपीओ तीसऱ्या दिवशी १.३८ पट सबस्क्राइब झाला.

सब्सक्रिप्शन
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)०.५६%
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)०.७६%
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१.२३%

एलआयसी आयपीओ शेअर्सची उपलब्धता | LIC IPO Availability of Shares

एलआयसी आयपीओची एकूण किंमत २१००८ कोटी रुपये असून पूर्ण २२१,३७४,९२० शेअर्स हे प्रमोटर्सकडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत.

शेअरची उपलब्धता पुढीलप्रमाणे असल्याचे समजते.

शेअर उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५०%>
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५%<
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५%<

एलआयसी आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | LIC IPO Share Price and Lot Size

एलआयसी आयपीओ शेअरची दर्शनी किंमत (फेस प्राइस )हि १० रुपये आहे.

या आयपीओमध्ये एका शेअरची किमान किंमत ९०२ रुपये आणि कमाल किंमत ९४९ रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि १५ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ९०२ * १५ = १३,५३० रुपये ते ९४९ * १५ = १४,२३५ रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,१७० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९४,३५० रुपये इतकी असणार आहे.

एलआयसी आयपीओची तारीख | LIC IPO Date

एलआयसी आयपीओ ४ मे २०२२ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ९ मे २०२२ असणार आहे, अशाप्रकारे दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे

एलआयसी आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट १२ मे २०२२ रोजी चालू होणार असून १६ मे २०२२ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १७ मे २०२२ ला एलआयसी बाजारात लिस्ट होईल.

एलआयसी आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of LIC IPO?

सध्या मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास ६५ रुपये असल्याचे समजते.

एलआयसी माहिती | Information of LIC

एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा प्रदाता कंपनी आहे.

एलआयसी मार्केट शेअर ६६.२% पेक्षा जास्त आहे.

एलआयसी कंपनी सहभागी विमा योजना, बचत स्कीम योजना, मुदत ठेव योजना, आरोग्य विमा, आणि वार्षिकी आणि पेन्शन योजना यासारख्या अनेक योजना ऑफर करते.

३० सप्टेंबर २०२१ पर्यंत, एलआयसीचे एकूण असेट अंडर मॅनेजमेन्ट रु. ३९ लाख कोटी रुपये होते.

एलआयसीच्या २०४८ शाखा, ११३ विभागीय कार्यालये आणि १५५४ ऑनलाईन कार्यालये आहेत.

हि सर्व कार्यालये फिजी, मॉरिशस, बांगलादेश, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, अरब राष्ट्रे, बहरीन, कतार, कुवेत आणि युनायटेड किंग्डममध्ये जागतिक स्तरावर कार्यरत आहे.

एलआयसी उजवी बाजू | Positives of LIC

  • एलआयसी ही एक विमा आणि गुंतवणूक योजना पुरवणारी कंपनी आहे आणि त्यांच्या योजना विमा आणि गुंतवणुकीचा एक हमी परताव्यासह संयोजन आहेत.
  • एलआयसी ही एक भाग विमा आणि काही गुंतवणूक उत्पादने देणारी कंपनी आहे. त्यांच्या योजना विमा आणि गुंतवणुकीचा एक हमी परताव्यासह संयोजन आहेत.
  • लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात एलआयसी लोकांमध्ये एक विश्वासार्ह ब्रँड आहे.
  • एलआयसी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे.

एलआयसी कंपनीची आर्थिक माहिती । Company Financials

तपशीलदशलक्ष रुपयेप्रतिवार्षिक
३१ ऑगस्ट २०२१३१ मार्च २०२३१ मार्च २०१९
एकूण मालमत्ता(Total Assets)३७,४६४,०४४३४,१४१,७४५३३,६६३,३४६
एकूण नफा (कर वगळता)(Profit After Tax)२९,७४१२७,१०४२६,२७३

थोडक्यात महत्वाचे | All Important

एलआयसी आयपीओ२१००८ कोटी रुपये
किमान किंमत ९०२ रुपये
कमाल किंमत ९४९ रुपये
लॉट साईझ १५
एकूण गुंतवणूक १३५३० रुपये ते १४,२३५ रुपये
आईपिओ खुला होणार ४ मे २०२२
आईपिओ बंद होणार ९ मे २०२२
शेअर्स इश्यू होणार १२ मे २०२२
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १६ मे २०२२
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार १७ मे २०२२

अधिक माहितीसाठी आपण खालील लिन्कवर क्लिक करु शकतात.

एलआयसी

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment