मित्रांनो, तुम्ही इन्ट्राडे ट्रेडर, शॉर्ट टर्म ट्रेडर किंवा पोझिशनल ट्रेडर कोणीही असा तुम्हाला तुमचा पैसा अगदी व्यवस्थित मॅनेज करता येणे गरजेचे आहे.
ट्रेडिंग च दुसरं नाव म्हणजे रिस्क-रिवॉर्ड असे आपण म्हणू शकतो.
तुम्ही ट्रेडिंगसाठी कोणतीही पद्धत वापरत असाल तरी शेअर मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला एन्ट्री, स्टॉप लॉस, टारगेट या सर्व गोष्टीचा आपल्याला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो.
आपण या लेखात रिस्क-रिवॉर्ड विषयी अगदी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया.
रिस्क-रिवॉर्ड म्हणजे काय ?
रिस्क म्हणजे धोका आणि रिवॉर्ड म्हणजे मोबदला होय.
आता आपण शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून रिस्क-रिवॉर्ड समजून घेऊ.
रिस्क म्हणजे ट्रेडमधील एन्ट्री प्राइस आणि स्टॉप लॉस मधील अंतर तर रिवॉर्ड म्हणजे एन्ट्री प्राइस आणि टारगेट प्राइस मधील अंतर होय.
ट्रेडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आपला स्टॉप लॉस गेला तर आपल्याला नुकसान होते, स्टॉप लॉस गेल्यामुळे होणारे हे नुकसान म्हणजे आपली रिस्क होय.
याउलट ट्रेडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आपल्याला टारगेट प्राइस भेटल्यास आपल्याला प्रॉफिट होतो, टारगेट प्राइस भेटल्यावर आपल्याला होणारा फायदा म्हणजे रिवॉर्ड होय.
आपण आता रिस्क-रिवॉर्ड उदाहरणावरून समजून घेऊ.
आपण आता असे गृहीत धरूया कि आपण एका आठवड्यात १० ट्रेड घेणार आहोत.
एका ट्रेडसाठी आपली रिस्क असणार आहे १०० रुपये.
सध्या अभ्यासासाठी आपण ब्रोकरेज आणि टॅक्स वगळणार आहोत.
सुरवातीला आपण रिस्क-रिवॉर्ड प्रमाण १:१ गृहीत धरून १० ट्रेडचा विचार करणार आहोत.
रिस्क-रिवॉर्ड :: १:१ म्हणजे लॉस झाला तर १०० रुपये आणि प्रॉफिट झाला तरी १०० रुपये.
पहिल्या कॉलममध्ये १० पैकी किती ट्रेड यशस्वी झाले आहेत ते दाखवले आहे तर इतर दोन कॉलममध्ये प्रॉफिट आणि लॉस दाखवला आहेत.
यशस्वी ट्रेड / १० | प्रॉफिट | लॉस |
---|---|---|
०/ १० | ०० | १००० |
१ / १० | १०० | ९०० |
२ / १० | २०० | ८०० |
३ / १० | ३०० | ७०० |
४ / १० | ४०० | ६०० |
५ / १० | ५०० | ५०० |
६ / १० | ६०० | ४०० |
७ / १० | ७०० | ३०० |
८ / १० | ८०० | २०० |
९ / १० | ९०० | १०० |
१०/ १० | १००० | ०० |
वर दिलेल्या तक्त्यात आपण बघू शकतो कि ना नफा ना तोटा पर्यंतची लेव्हल ५० % ट्रेडला यशस्वी होते.
मित्रांनो, खरी गंमत इथून पुढे चालू होणार आहे तेव्हा पुढे वाचत रहा.
आता आपण रिस्क-रिवॉर्ड प्रमाण १:२ गृहीत धरून १० ट्रेडचा विचार करूया.
रिस्क-रिवॉर्ड :: १:२ म्हणजे लॉस झाला तर १०० रुपये आणि प्रॉफिट झाला तरी २०० रुपये.
यशस्वी ट्रेड / १० | प्रॉफिट | लॉस |
---|---|---|
०/ १० | ०० | १००० |
१ / १० | २०० | ९०० |
२ / १० | ४०० | ८०० |
३ / १० | ६०० | ७०० |
४ / १० | ८०० | ६०० |
५ / १० | १००० | ५०० |
६ / १० | १२०० | ४०० |
७ / १० | १४०० | ३०० |
८ / १० | १६०० | २०० |
९ / १० | १८०० | १०० |
१०/ १० | २००० | ०० |
आपण बघू शकतो कि फक्त ४ त्या ट्रेडपासूनच ट्रेडर प्रॉफिट सुरु झाला आहे.
यशस्वी ट्रेड / १० | प्रॉफिट | लॉस |
---|---|---|
०/ १० | ०० | १००० |
१ / १० | ३०० | ९०० |
२ / १० | ६०० | ८०० |
३ / १० | ९०० | ७०० |
४ / १० | १२०० | ६०० |
५ / १० | १५०० | ५०० |
६ / १० | १८०० | ४०० |
७ / १० | २१०० | ३०० |
८ / १० | २४०० | २०० |
९ / १० | २७०० | १०० |
१०/ १० | ३००० | ०० |
आपण बघू शकतो कि फक्त ३ऱ्या ट्रेडपासूनच प्रॉफिट सुरु झाला आहे.
आता आपण रिस्क-रिवॉर्ड प्रमाण १:४ गृहीत धरून १० ट्रेडचा विचार करूया.
रिस्क-रिवॉर्ड :: १:४ म्हणजे लॉस झाला तर १०० रुपये आणि प्रॉफिट झाला तरी ४०० रुपये.
यशस्वी ट्रेड / १० | प्रॉफिट | लॉस |
---|---|---|
०/ १० | ०० | १००० |
१ / १० | ४०० | ९०० |
२ / १० | ८०० | ८०० |
३ / १० | १२०० | ७०० |
४ / १० | १६०० | ६०० |
५ / १० | २००० | ५०० |
६ / १० | २४०० | ४०० |
७ / १० | २८०० | ३०० |
८ / १० | ३२०० | २०० |
९ / १० | ३६०० | १०० |
१०/ १० | ४००० | ०० |
असे म्हणतात कि कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करून ट्रेड घेतले तरी जास्तीत जास्त ७०% ट्रेड यशस्वी होतात.
त्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करताना रिस्क-रिवॉर्ड वर खूप जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे आपल्या लक्षात आलंच असेल.
यावरून आपल्या लक्षात आलंच असेल कि जर आपण १० पैकी फक्त २ ट्रेड १:४ प्रमाणात यशस्वीपणे केले तरी आपण आपल्या ८ ट्रेडचा लॉस भरून काढू शकतो.
अधिक चांगल्या प्रकारे हे समजून घेण्यासाठी आपण १ आठवड्याची ट्रेडिंग बघूया ज्यात रिस्क-रिवॉर्ड चे प्रमाण वेगवेगळे आहे.
यात सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे कि रिस्क आपण १०० /ट्रेड ठेवायची आहे.
ट्रेड क्रमांक | प्रॉफिट | लॉस |
---|---|---|
१ | २०० | |
२ | १०० | |
३ | ३०० | |
४ | ४०० | |
५ | ३०० | |
६ | १०० | |
७ | १०० | |
८ | १०० | |
९ | २०० | |
१० | ४०० | |
एकूण | १९०० | ३०० |
मित्रांनो, आपण आपले ट्रेडिंग रेकॉर्ड अशाप्रकारे ठेवल्यास आपण ट्रेडिंग करून किती यशस्वी होत आहोत हे लगेच येऊ शकेल.
अशाप्रकारे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपले जास्तीत जास्त ट्रेड यशस्वी करायचे आहे आणि लॉसमध्ये असणारे ट्रेड कमीत कमी लॉसमध्ये किंवा ठरलेल्या रिस्क प्रमाणे एक्झिट करायचे आहे.
आता आपण चार्टवर रिस्क-रिवॉर्ड बघूया.
खालील तक्त्यात आपण रिस्क-रिवॉर्ड आणि प्रॉफिट-लॉस ची तुलना करणार आहोत.
सर्वात डाव्या बाजूचा कॉलम रिस्क-रिवॉर्ड दाखवतो जो कमीत कमी १:१ आणि जास्त १:५ गृहीत धरला आहे.
तक्त्याच्या पहिल्या ओळीत ५ पैकी किती ट्रेड यशस्वी झाले आणि त्याची टक्केवारी दाखवली आहे.
५ ट्रेड नंतर लॉस वजा करून आपल्याला किती प्रॉफिट मिळतोय ते नमूद केले आहे.
१ ला कॉलम रिस्क-रिवॉर्ड दाखवतो आहे.
२ रा कॉलम सर्व ट्रेड लॉसमध्ये दाखवतो.
३ रा कॉलम फक्त १ ट्रेड प्रॉफिटमध्ये दाखवतो आणि इतर ४ ट्रेडचा लॉस वजा जात आपल्या हातात काय शिल्लक राहते ते नमूद केले आहे.
४था कॉलम २ ट्रेड प्रॉफिटमध्ये दाखवतो.
५ वा कॉलम ३ ट्रेड प्रॉफिटमध्ये दाखवतो.
६ वा कॉलम ४ ट्रेड प्रॉफिटमध्ये दाखवतो आणि फक्त १ ट्रेंड लॉसमध्ये दाखवतो.
७ वा कॉलम सर्व ट्रेड प्रॉफिटमध्ये दाखवतो.
रिस्क-रिवॉर्ड | ०/५ (००%) | १/५ (२०%) | २/५ (४०%) | ३/५ (६०%) | ४/५ (८०%) | ५/५ (१००%) |
---|---|---|---|---|---|---|
( १ ) | ( २ ) | ( ३ ) | ( ४ ) | ( ५ ) | (६) | ( ७ ) |
१:१ | -५०० | -३०० | -१०० | +१०० | +३०० | +५०० |
१:२ | -५०० | -२०० | +१०० | +४०० | +७०० | +१००० |
१:३ | -५०० | -१०० | +३०० | +७०० | +११०० | +१५०० |
१:४ | -५०० | ०० | +५०० | +१००० | +१५०० | +२००० |
१:५ | -५०० | +१०० | +७०० | +१३०० | +१९०० | +२५०० |
हिरव्या रंगाने मी एकूण प्रॉफिट आणि लाल रंगाने एकूण लॉस दाखवला आहे.
मित्रांनो, या सर्व चार्टचा जरूर अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला रिस्क-रिवॉर्ड आणि ट्रेड मॅनेजमेंट कसे करावे याविषयीचा दृष्टिकोन तयार करण्यास नक्की मदत होईल.
याशिवाय सर्वसाधारणपणे १:३ किंवा त्यापेक्षा अधिक रिस्क-रिवॉर्ड चांगला समजला जातो तेव्हा ट्रेडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी आपण रिस्क-रिवॉर्डचा जरूर विचार करा.
आपला स्टॉप लॉस किती पॉईंट आहे आणि टारगेट किती पॉईंट आहे याचा विचार करूनच ट्रेड घेतलेला चांगलं.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण रिस्क-रिवॉर्ड अतिशय सविस्तरपणे बघितले तरी आपल्याला काही शंका असल्यास किंवा सूचना करायची असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाइक करा.
आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- टेक्निकल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसचे [३] आधार मराठीत । Technical Analysis in Marathi and [3] Principles of Technical Analysis of Stocks
- सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी | Support and Resistance in Marathi
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिस मराठी | Volume and Volume Analysis in Marathi
- हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मराठी । Head and Shoulder Chart Pattern in Marathi