कॅश फ्लो स्टेटमेंट मराठी । Cash Flow Statement in Marathi

3.7/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

कॅश फ्लो स्टेटमेंट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.

या लेखात आपण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय ? कॅश फ्लो स्टेटमेंट कुठे उपलब्ध असते ? कॅश फ्लो स्टेटमेंटमधून आपल्याला काय माहिती मिळते ? अशी सर्व सविस्तर चर्चा करणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय ? । What is Cash Flow Statement ?

कॅश म्हणजे रुपये, फ्लो म्हणजे आवक-जावक आणि स्टेटमेंट म्हणजे दस्तऐवज किंवा अहवाल.

कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे कंपनीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाची जी आवक-जावक झाली आहे तिचा अहवाल होय.

कॅश स्टेटमेंट कुठे मिळेल ?

आपल्याला कंपनीच्या वेबसाइटवर किंवा मनी कन्ट्रोल वेबसाइटवर कॅश फ्लो स्टेटमेंट मिळू शकेल.

खाली मी कशाप्रकारे कंपनीची आर्थिक माहिती मनी कन्ट्रोल वेबसाईटवर मिळवता येईल ते दाखवले आहे.

tata motors balance sheet

कंपनीच्या नावावर क्लिक केल्यावर आपल्याला कंपनीची माहिती उपलब्ध असते त्यात आपल्याला खाली दाखवल्याप्रमाणे कंपनीचे फायनांशियल्स (Financials) बघायचे आहे.

आपल्याला पाहिजे असल्यास आपण सर्व माहिती मराठीत देखील बघू शकतो त्यासाठी आपल्याला पेजवर राइट क्लिक करून ट्रान्सलेट (Translate) पर्याय निवडायचा आहे.

translate page

आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट सविस्तर वाचायचे असल्याने आपण उजव्या बाजूच्या कॅश फ्लो स्टेटमेंट पर्यायावर क्लिक करायचे आहे.

खाली मी कॅश फ्लो स्टेटमेंट कसे ओपन करायचे ते दाखवले आहे.

cfs1

खाली मी कॅश फ्लो स्टेटमेंट समजून घेण्यासाठी टाटा मोटर्स कंपनीचे कॅश फ्लो स्टेटमेंट घेतले आहे.

cfs
cfs2

आता आपण कॅश फ्लो स्टेटमेंटच्या सर्व ओळी सविस्तर समजून घेऊ.

सर्वात वरच्या उजव्या कोपऱ्यात टाटा मोटर्स कंपनीचे नाव दिले आहे आणि त्याखाली आपल्याला स्टॅन्डअलोन आणि एकत्रित असे दोन पर्याय दिले आहेत.

स्टॅन्डअलोन म्हणजे मुख्य कंपनीचे तर एकत्रित म्हणजे टाटा मोटर्स आणि तिच्या उपकंपन्या यांचा एकत्रित अहवाल.

उदा. स्टॅन्डअलोन मध्ये फक्त भारतात असलेल्या उद्योगाविषयी अहवाल तर कन्सॉलिडेटेड म्हणजे भारत तसेच देशाबाहेर असणाऱ्या उपकंपन्यांचा देखील एकत्र अहवाल.

चार्टवर आपल्याला टाटा मोटर्स कंपनीचा मागील ५ वर्षांचे कॅश फ्लो स्टेटमेंट उपलब्ध आहे.

पहिल्या ओळीत कंपनीचा कर देण्यापूर्वी कंपनीने मिळवलेला नफा दिलेला आहे.

कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी :

या विभागात आपल्याला मुख्य उद्योगातून कंपनीमध्ये आलेला आणि कंपनीच्या बाहेर गेलेला पैसा याचा अंदाज येतो.

कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये कंपनीकडे आलेला पैसा पॉझिस्टिव्ह किंवा धन चिन्हाने दाखविला जातो तर कंपनीतून बाहेर गेलेला पैसा निगेटिव्ह किंवा ऋण चिन्हाने दाखवतात.

कॅश फ्लो स्टेट्मेंट्मधे बाहेर गेलेला पैसा दाखवण्यासाठी कंस देखील वापरतात उदा. (४५,०००).

या रकान्याला एनएफओ असे देखील म्हणतात.

आपल्याला टाटा मोटर्स कंपनीच्या चार्टवर मार्च २०२१ रोजी असणारा कॅश फ्लो २९०००.५१ दिसत आहे.

आपल्याला कंपनीचा अभ्यास करताना कंपनीचा नेट प्रॉफिट किंवा निव्वळ नफा आणि कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी यांची तुलना करायची असते आणि या दोन्ही गोष्टी जवळपास सारख्याच असणे अपेक्षित असते.

कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी

या रकान्यात आपल्याला कंपनीने गुंतवणूक केलेला पैसा दिसून येतो.

उदा. कंपनीने एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली असेल, बँकेत पैसा डिपॉझिट अकाउंटमध्ये टाकला असेल, मशीन खरेदी केले असेल, सॉफ्टवेअर खरेदी केले असतील तर असा पैसा आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटच्या या रकान्यात दिसून येतो.

या रकान्यात दाखवलेला पैसा हा कंपनीतून बाहेर गेलेला पैसा असतो म्हणून तो कंसात दाखवला जातो किंवा ऋण दाखवला जातो.

कंपनी आपल्या उद्योगात इन्व्हेस्ट करत असेल तर अशा कंपनीत येत्या काळात चांगले अहवाल येण्याची आपण अपेक्षा करू शकतो.

कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी

या रकान्यात आपल्याला कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे विवरण आढळते.

उदा. कंपनीने कर्ज घेतल्यास किंवा शेअर्स विक्री करून भांडवल उभे केले असल्यास आपल्याला कॅश फ्लो फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीच्या रकान्यात हि रक्कम दाखवली जाते.

त्याचप्रमाणे आपल्याला कंपनीने डिव्हिडंड दिला असल्यास किंवा शेअर्स बायबॅक केले असल्यास ती रक्कम कंसात दाखवलेली म्हणजेच कंपनीच्या बाहेर गेलेली आढळून येते.

याचा अर्थ कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये दिसणारी प्रत्येक बाहेर जाणारी रक्कम हि कंपनीसाठी उणीव दाखवणारी असेल असे नाही.

शेवटच्या दोन ओळींत आपल्याला वर्षाच्या सुरवातीला आणि वर्षाच्या शेवटी कंपनीकडे शिल्लक असलेली रक्कम दाखवली आहे.

शेअर मार्केट आणि फन्डामेन्टल ॲनालिसिस विषयी अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment