नमस्कार मित्रांनो,
‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.
शेअर मार्केटमध्ये काम करत असताना आपण एन्ट्री, स्टॉप लॉस, टारगेट असे विविध शब्द वारंवार ऐकत असतो.
या लेखात आपण स्टॉपलॉस म्हणजे काय ते अगदी सविस्तर समजून घेणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया
स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss ?
लॉस म्हणजे नुकसान तर स्टॉप म्हणजे थांबवणे.
स्टॉप लॉस म्हणजे आपण आपल्या ट्रेडमधून कमीतकमी नुकसान स्वीकारून बाहेर पडण्याची व्यवस्था होय.
आपण स्टॉप लॉस ऑर्डर लावतो म्हणजे ट्रेडिंग करत असताना आपले नुकसान मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो.
लॉस किंवा नुकसान हा ट्रेडिंगचा अविभाज्य भाग आहे मात्र आपले नुकसान मर्यादित ठेवणे शहाणपणाचे ठरते.
आता आपण स्टॉप लॉस लावतो म्हणजे नेमके काय करतो ते बघूया.
स्टॉपलॉस कसा लावतात ? । How to put Stop Loss in trading ?
मित्रांनो, आपण जर खरेदीचा ट्रेड किंवा लॉन्ग साइड ट्रेड घेतला असेल तर आपल्याला विक्रीचा स्टॉप लॉस लावावा लागतो याउलट आपण जर शॉर्ट साइड ट्रेड घेतला असेल तर आपल्याला बाय साइड स्टॉपलॉस ठेवावा लागतो.
खाली मी स्टॉपलॉस ऑर्डर विन्डो दाखवत आहे.
![स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss in Marathi ? 2 Capture](https://paisazalamotha.com/wp-content/uploads/2022/05/Capture.jpg)
![स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss in Marathi ? 3 Capture 1](https://paisazalamotha.com/wp-content/uploads/2022/05/Capture-1.jpg)
पहिल्या दोन विन्डो बाय साइड स्टॉपलॉस विन्डो आहे.
पहिल्या विन्डोमध्ये आपल्याला स्टॉकची संख्या, प्राइस आणि ट्रिगर प्राइस अशा सर्व गोष्टी द्याव्या लागतात.
प्राइस म्हणजे ज्या प्राइसला आपल्याला स्टॉपलॉस ठेवायचा आहे ती प्राइस आणि ट्रिगर प्राइस म्हणजे ऑर्डर ॲक्टिव्हेट करण्याची प्राइस होय.
दुसरी ऑर्डर म्हणजे स्टॉपलॉस मार्केट ऑर्डर होय.
दुसऱ्या ऑर्डरमध्ये आपल्याला फक्त ट्रिगर प्राइस द्यावी लागते आणि आपली पोझिशन ऑर्डर ट्रिगर होताच मार्केट प्राइसला स्केअर ऑफ होते.
अशाप्रकारे आपल्याला सेल साइड स्टॉपलॉस देखील लावता येतो.
खाली मी स्टॉपलॉस विन्डो दाखवत आहे.
![स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss in Marathi ? 4 Capture 2](https://paisazalamotha.com/wp-content/uploads/2022/05/Capture-2.jpg)
![स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss in Marathi ? 5 Capture 3](https://paisazalamotha.com/wp-content/uploads/2022/05/Capture-3.jpg)
आता आपण चार्टवर स्टॉपलॉस समजून घेऊया.
खाली मी चार्टवर लॉन्ग साइड आणि शॉर्ट साइड स्टॉपलॉस दाखवला आहे.
![स्टॉप लॉस म्हणजे काय ? । What is Stop Loss in Marathi ? 6 stoploss](https://paisazalamotha.com/wp-content/uploads/2022/05/stoploss.jpg)
शेअर मार्केट आणि फन्डामेन्टल ॲनालिसिस विषयी अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.
आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.
मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- इन्ट्राडे ट्रेडींग मराठी | Intraday Trading in Marathi
- हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मराठी । Head and Shoulder Chart Pattern in Marathi
- व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिस मराठी | Volume and Volume Analysis in Marathi
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- टेक्निकल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसचे [३] आधार मराठीत । Technical Analysis in Marathi and [3] Principles of Technical Analysis of Stocks
- सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी | Support and Resistance in Marathi