नमस्कार मित्रांनो,
‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.
हा आयपीओ १९ जानेवारी २०२२ रोजी शेअर बाजारात दाखल होत असून आयपीओच्या माध्यमातून एजीएस ६८० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एजीएस एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
चला तर मग माहिती घेऊया एजीएस आयपीओची
एजीएस आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | AGS IPO Subscription Status
(AGS Transact IPO) शेवटच्या दिवशी २.७४ पट सबस्क्राइब झाला.
सब्सक्रिप्शन | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | २.६८% |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | २५.६१% |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | ३.०८% |
एजीएस आयपीओची एकूण किंमत ६८० कोटी रुपये असून पूर्ण ६८० कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत.
शेअरची उपलब्धता पुढीलप्रमाणे असल्याचे समजते.
शेअर उपलब्धता | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ५०%> |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | १५%< |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | ३५%< |
एजीएस आयपीओ शेअरची दर्शनी किंमत (फेस प्राइस )हि १० रुपये आहे.
या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत १६६ रुपये आणि कमाल किंमत १७५ रुपये असणार आहे.
एका लॉटमधील शेअरची संख्या हि ८५ असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १६६ * ८५ = १४,११० रुपये ते १७५ * ८५ = १४,८७५ रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,११० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९३,३७५ रुपये इतकी असणार आहे.
एजीएस आयपीओची तारीख | AGS IPO Date
एजीएस आयपीओ १९ जानेवारी २०२२ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख २१ जानेवारी २०२२ असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे
एजीएस आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट २७ जानेवारी २०२२ रोजी चालू होणार असून ३१ जानेवारी २०२२ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १ फेब्रुवारी २०२२ ला एजीएस बाजारात लिस्ट होईल.
एजीएस आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of AGS IPO?
सध्या मार्केटमध्ये एजीएस आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास १८ रुपये असल्याचे समजते.
एजीएस माहिती | Information of AGS
एजीएस (AGS Transact Technologies Ltd) ही भारतातील आघाडीच्या ओम्नी-चॅनल पेमेंट सोल्यूशन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे.
एटीएमद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या सेवांमधून मिळणाऱ्या कमाईच्या बाबतीत ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
एजीएसने भारतात सर्वात जास्त पेट्रोल पंपावर पीओएस टर्मिनल्सची व्यवस्था उभारली आहे, पीओएस म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इ विविध साधनांद्वारे पैसे स्वीकारण्याची व्यवस्था.
एजीएस भारत तसेच श्रीलंका, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलीपिन्ससह इतर आशियाई देशांमध्ये देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेली आहे.
एजीएस प्रामुख्याने खालील ३ व्यवसाय विभागांमध्ये कार्यरत आहे:
१. पेमेंट प्रोसेसिंग सोल्युशन सेवा जसे की एटीएम आणि सीआरएम आउटसोर्सिंग, रोख व्यवस्थापन सेवा, डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स, ट्रान्झॅक्शन स्विचिंग सेवा, पीओएस मशीन सेवा, एजन्सी बँकिंग इ.
३१ ऑगस्ट २०२१ अखेर, आउटसोर्सिंग अंतर्गत एजीएसचा १४,०९९ एटीएम आणि सीआरएमचा पोर्टफोलिओ होता आणि व्यवस्थापित सेवा विभागांतर्गत १९,१६१ एटीएम आणि सीआरएमचे व्यवस्थापन कंपनीकडे होते.
हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या आघाडीच्या भारतीय पेट्रोलियम आउटलेट्सवर पीओएस टर्मिनल लावले आहेत तर डॉ. लाल पॅथलॅब्स, पतंजली आयुर्वेद, आरजे कॉर्प लिमिटेड, ऑरगॅनिक इंडिया कॉर्पोरेट इ एजीएसचे ग्राहक आहेत.
२. बँकिंग ऑटोमेशन सोल्युशन्स म्हणजे एटीएम आणि सीआरएमची विक्री, सेल्फ-सर्व्हिस टर्मिनल्स, आणि संबंधित सेवा.
३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत, एजीएसकडे ५०+ बँकिंग ग्राहक जसे आयसीआयसीआय (ICICI) बँक, अॅक्सिस (Axis Bank )बँक आणि एचडीएफसी (HDFC)बँक लि.
३. पेट्रोलियम, रिटेल ग्राहकांसाठी इतर ऑटोमेशन सोल्युशन्स जसे की सिस्टम ऑटोमेशन प्रॉडक्ट्स, सिस्टम इंटिग्रेशन, रिमोट मॅनेजमेंट आणि इतर सेवा पुरवणे.
कंपनीचा व्यवसाय २२०० शहरे आणि शहरांमध्ये ४,४६,००० मशीन किंवा ग्राहक पॉइंट्सद्वारे ग्राहकांना सेवापुरवण्यापर्यंत विस्तारला आहे.
एजीएस उजवी बाजू | Positives of AGS
- वैविध्यपूर्ण उत्पादनांचा पोर्टफोलिओ.
- मोठा ग्राहकवर्ग आणि मोठे नेटवर्क.
एजीएस कंपनीची आर्थिक माहिती । Company Financials
थोडक्यात महत्वाचे | All Important
एजीएस आयपीओ | ६८० कोटी रुपये |
किमान किंमत | १६६ रुपये |
कमाल किंमत | १७५ रुपये |
लॉट साईझ | ८५ |
एकूण गुंतवणूक | १४,११० रुपये ते १४,८७५ रुपये |
आईपिओ खुला होणार | १९ जानेवारी २०२२ |
आईपिओ बंद होणार | २१ जानेवारी २०२२ |
शेअर्स इश्यू होणार | २७ जानेवारी २०२२ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | ३१ जानेवारी २०२२ |
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | १ फेब्रूवारी २०२२ |
अधिक माहितीसाठी आपण खालील लिन्कवर क्लिक करु शकतात.
अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.
आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!