हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा शेअर मार्केट टेकनिकल ॲनालिसिस आणि कॅन्डलस्टिक ॲनालिसिस मधील सर्वात महत्वाच्या पॅटर्नपैकी एक पॅटर्न आहे.
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक लोकप्रिय पॅटर्न असून ट्रेडिंगसाठी देखील खूप उपयुक्त आहे.
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नलाच पिनबार असेही म्हणतात.
या लेखात आपण हॅमर पॅटर्नचे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे दोन्ही प्रमुख प्रकार बघणार आहोत.
हॅमर पॅटर्न चार्टवर कुठे तयार होतो त्यावरून हॅमर पॅटर्नचे वेगवेगळे अर्थ आणि महत्व असते.
आपण या लेखात हॅमर पॅटर्नचा सविस्तर अभ्यास करणार असून हॅमर पॅटर्नचा ट्रेडिंग साठी उपयोग कसा करतात ते सुद्धा बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न | Hammer Candlestick Pattern
खालील चित्रात हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एखाद्या हातोड्याप्रमाणे दिसत असल्याने या पॅटर्नला हॅमर पॅटर्न असे म्हणतात.
हॅमर कॅन्डलस्टिक लाल आणि हिरव्या अशा दोन्ही रंगात आढळून येते.
या पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या रंगाला खूप जास्त महत्व नाही.
हॅमर कॅण्डल ५ मी, १५ मी, १ तास आणि १ दिवस अशा सर्व टाइम फ्रेमवर आढळून येतो.
आता आपण हॅमर पॅटर्न चार्टवर बघूया
मित्रांनो आपल्यासोबत इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स स्टॉकचा १५ मी. चार्ट आहे
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करावा? | How to Trade With Candlestick Pattern?
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून लोकप्रिय आहे.
हॅमर कॅण्डल अपट्रेंडच्या शेवटी किंवा डाउनट्रेंडच्या शेवटी तयार झाल्यास स्टॉकमधील ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता असते.
हॅमर कॅण्डल आणि डाउनट्रेंड | Hammer Candle in Downtrend
एका मोठ्या डाउनट्रेंड नंतर हॅमर कॅण्डल तयार झाल्यास तो एक बुलिश सिग्नल समजला जातो.
एका चांगल्या हॅमर कॅण्डलला वरच्या बाजूला कोणतीही वीक नसते आणि हॅमरची टेल हि हॅमरच्या बॉडीपेक्षा २ ते ३ पट असते.
मित्रांनो प्रत्यक्षात मात्र अगदी असाच हॅमर पॅटर्न आपल्याला चार्टवर मिळेल असे नाही त्यामुळे हॅमर कॅन्डलच्या वरच्या बाजूला लहानशी वीक असल्यास हरकत नाही.
आपण इथे त्या हॅमर कॅन्डलच्या मागील शेअर बाजरातील मानसिकता लक्षात घेणे गरजेचे आहे.
हॅमर कॅन्डलची टेल मात्र मोठी असल्यास तो एक अधिक चांगला सिग्नल समजला जातो.
हॅमर कॅण्डल पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या रंगाला फारसे महत्व नसले तरी डाउनट्रेंड नंतर तयार होणारी हॅमर कॅण्डल हिरव्या रंगाची असल्यास तो एक जास्त बुलिश सिग्नल होय
आपल्यासोबत इंडसइंड बँकेचा डेली कॅन्डलस्टिक चार्ट आहे.
आपण बघू शकतो कि चार्टवर डाउनट्रेंड नंतर हॅमर पॅटर्न तयार झाला आहे.
आपण जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर हॅमर पॅटर्न तयार झाल्यावर बायिंग साइड एंट्री घेऊ शकतात.
हॅमरच्या टॉपवर आपण बाय ऑर्डर प्लेस करायची आहे तर हॅमरच्या बॉटमवर स्टॉप लॉस लावायचा आहे
चार्टवर हिरव्या रंगाच्या रेषेने एन्ट्री लेव्हल दाखवली आहे तर लाल रंगाची रेषा हि स्टॉप लॉस दर्शविते.
आपल्याला अधिक सुरक्षित एन्ट्री घ्यायची असेल तर आपण चार्टवर हॅमर कॅण्डल तयार झाल्यानंतर कन्फर्मेशन कॅण्डल म्हणजेच अजून काही बुलिश सिग्नल तयार होईपर्यंत थांबू शकतात.
आता आपण अपट्रेन्ड नंतर हॅमर कॅण्डल तयार झाल्यानंतर कसे ट्रेड करायचं ते बघूया
हॅमर कॅण्डल आणि अपट्रेंड | Hammer Candle in Uptrend
मित्रांनो आपल्यासोबत पॉवरग्रीड स्टॉकचा डेली चार्ट आहे
आपण वरील चार्टवर बघू शकतो कि अपट्रेन्ड नंतर चार्टवर हॅमर कॅण्डल तयार झाली आहे आणि स्टॉक मधील अपट्रेन्ड बदलून स्टॉक मध्ये डाउनट्रेंड सुरु झाला आहे
हॅमर कॅण्डल नंतर आपल्याला मोठ्या लाल कॅन्डलने डाउनट्रेंड सुरु होणार असल्याचे कन्फर्मेशन देखील दिले आहे.
आपल्याला लाल कॅन्डलच्या बॉटम लेव्हलला शॉर्ट ट्रेड मध्ये एन्ट्री घ्यायची आहे आणि लाल कॅन्डलच्या टॉपला आपण स्टॉप लॉस लावायचा आहे.
अपट्रेन्ड नंतर हॅमर कॅण्डल तयार झाल्यास देखील स्टॉक मधील ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
अपट्रेन्ड नंतर तयार होणाऱ्या हॅमर कॅण्डलला हँगिंग मॅन असे नाव आहे.
इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न | Inverted Hammer Candlestick Pattern
आता आपण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत.
इन्व्हर्टेडचा अर्थ इथे उलटा असा आहे.
इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे उलटा कॅन्डलस्टिक हॅमर होय.
इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डलला वरच्या बाजूला मोठी वीक असते आणि हॅमरची टेल नसते किंवा टेल हि खूप लहान असते तसेच हॅमरची वीक हॅमरच्या बॉडीपेक्षा २ ते ३ पट असते.
प्रत्यक्षात अगदी असाच इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न आपल्याला चार्टवर मिळेल असे नाही त्यामुळे हॅमर कॅन्डलच्या खालच्या बाजूला लहानशी टेल असल्यास हरकत नाही.
मात्र वीक जितकी मोठी कॅण्डल तेवढीच परिणामकारक समजली जाते.
आपण जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न तयार झाल्यावर लगेचच सेल साइड एंट्री घेऊ शकतात.
इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करावा? | How to Trade With Inverted Hammer Candlestick Pattern?
इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल आणि अपट्रेंड | Inverted Hammer Candle in Uptrend
आता आपण अपट्रेन्ड असताना चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल तयार झाल्यास त्याचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा ते बघूया
आपण खालील चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बघू शकतो
मित्रांनो आपल्यासोबत इथे सिपला कंपनीचा डेली चार्ट आहे.
आपण चार्टवर बघू शकतो कि स्टॉक मधील अगोदरचा ट्रेंड हा अपट्रेन्ड आहे आणि स्टॉक वर इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न तयार झाला आहे.
चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल तयार झाल्यावर स्टॉक मधील अपट्रेंड बदलला आहे आणि स्टॉक ची किंमत कोसळली आहे
अगोदरच सांगितल्याप्रमाणे हॅमर कॅण्डल हि लाल किंवा हिरव्या कोणत्याही रंगाची असली तरी सारखीच काम करते.
असे असले तरी अपट्रेन्ड नंतर लाल रंगाची इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल तयार झाल्यास तो अधिक बेअरिश सिग्नल समजला जातो.
चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाल्यावर आपण कॅन्डलच्या बॉटम लेव्हलला आपण सेल ट्रेड घ्यायचा आहे तर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलच्या टॉप लेव्हलला आपण स्टॉप लॉस लावायचा आहे.
चार्टवर हिरव्या रंगाने एन्ट्री लेव्हल आणि लाल रंगाने स्टॉप लॉस लेव्हल दाखवली आहे
इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल आणि डाउनट्रेंड | Inverted Hammer Candle in Downtrend
आता आपण चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न डाउनट्रेंड मध्ये तयार झाल्यावर ट्रेड कसा घ्यायचा ते बघणार आहोत.
आपण चार्टवर बघू शकतो कि स्टॉक मधील अगोदरचा ट्रेंड हा डाउनट्रेन्ड आहे आणि स्टॉक वर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे.
चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल तयार झाल्यावर स्टॉक मधील डाउनट्रेन्ड बदलला आहे आणि स्टॉकची किंमत वाढली आहे.
डाउनट्रेंड मध्ये इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाल्यास आपल्याला कन्फर्मेशनची वाट बघायची आहे आणि कन्फर्मेशन भेटल्यावरच ट्रेड घ्यायचा आहे.
मित्रांनो अशाप्रकारे या लेखात आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे दोन खूप महत्वपूर्ण आणि उपयोगी कॅण्डल पॅटर्न बघितले तसेच या पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करायचा ते देखील बघितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला खालील कमेंटबॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा.
आपल्या प्रतिक्रिया वाचून मला काम करण्यासाठी उत्साह मिळतो तेव्हा कमेंट करायला विसरू नका.
हा लेख वाचून आपल्या माहितीत वाढ झाली असेल अशी मला आशा आहे.
आपण वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
- एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Engulfing Candlestick Pattern in Marathi
- डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi
- पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi
- बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern
- बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi
- कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi
- शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi
- थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi
- थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi
- मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi
- इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Evening Star Candlestick Pattern in Marathi
- बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi