मित्रांनो, या लेखात आपण असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न आणि डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न अशा दोन पॅटर्नची सखोल माहिती बघणार आहोत.
हे दोन्ही पॅटर्न हे ट्रेंड कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न असून, आपल्याला पुलबॅक ट्रेडिंग करताना स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी खूप उपयोगी आहेत.
कॉन्टीनुएशन म्हणजे तसेच पुढे चालू राहणे होय.
चार्ट वर कॉन्टीनुएशन पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉक मधील सध्याचा जो ट्रेंड आहे तो तसाच पुढेही काही काळ चालू राहण्याची अधिक शक्यता असते.
कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न च्या मदतीने आपण जर एखादा स्टॉक अगोदरच भरपूर चांगल्या ट्रेंड मध्ये असेल तर त्या स्टॉक मध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारची एन्ट्री घेण्यासाठी वापरतो.
इतर चार्ट पॅटर्न प्रमाणेच या चार्ट पॅटर्नमध्ये देखील ब्रेकआऊट आणि ब्रेकडाउनला खूप महत्व आहे
चला तर मग सुरवात करूया.
असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी | Ascending Triangle Chart Pattern in Marathi
असेंडिंग म्हणजे चढता आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोण होय
चार्ट वर तयार होणारा चढत्या त्रिकोणाचा चार्ट पॅटर्न म्हणजेच असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न.
खालील चित्रात असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न दाखवला आहे
असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा एक अपट्रेंड मध्ये तयार होणारा चार्ट पॅटर्न असून स्टॉक जेव्हा बुलिश असतो तेव्हा हा चार्ट पॅटर्न तयार होतो.
वरील चित्रात आपण बघू शकतो कि स्टॉक अपट्रेन्ड मध्ये आहे मात्र स्टॉक मधील अप मूव्ह थांबली आहे.
स्टॉक ची किंमत आता आणखी वर जाइल कि नाही याबाबत अनिश्चितता आहे.
काही अंतरावर स्टॉक मध्ये एक रेझिस्टन्स तयार झाल्यासारखा दिसतोय आणि स्टॉकचे स्विंग हाइझ एका सरळ रेषेत तयार होत आहेत.
स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर जाऊ शकत नाही आणि वारंवार खाली घसरते आहे
याउलट स्टॉकची किंमत थोडया अंतरावरील सपोर्टलाइन पासून पुन्हा पुन्हा सावरायला सुरुवात होते आहे.
चित्रात काळ्या रंगाच्या रेषांनी तयार होणारे सपोर्ट आणि रेझिस्टन्स दाखवले आहेत
सपोर्ट लाइन हि लगतच्या स्विंग हाइझ मधून तर रेझिस्टन्स लाइन लगतच्या स्विंग्स मधून जाते आहे.
अनेक जण या तिरप्या सपोर्ट लाइनला ट्रेंड लाइन्स असेही म्हणतात
अशाप्रकारे या तिरप्या सपोर्ट लाइन आणि आडव्या रेझिस्टन्स लाइन पासून तयार होतो तो चढता त्रिकोण आणि असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न
या चार्ट पॅटर्न मध्ये हायर लोझ तयार होत जातात आणि मोठ्या प्रमाणात वोलॅटिलिटी कॉम्प्रेशन होते.
शेअर बाजारात वोलॅटिलिटी कॉम्प्रेशन नंतर बऱ्याचदा एक मोठी मूव्ह येते आणि हीच मूव्ह आपल्याला मोठा प्रॉफिट मिळवून देऊ शकते.
चित्रात दाखवल्याप्रमाणे बुल्स स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत तर बियर्स स्टॉकची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत
काही काळानंतर मात्र बुल्सची पुन्हा सरशी होते आणि प्राइस रेझिस्टन्स लाइनच्या पलीकडे जाऊन क्लोझ होते यालाच शेअर मार्केटच्या भाषेत आपण ब्रेकआऊट असे म्हणतो.
स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेंड अपट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेंड देखील अपट्रेन्डच असल्याने या पॅटर्नला बुलिश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न असे नाव आहे.
असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?
एंट्री :
- जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकआऊट झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
- बरेच ट्रेडर्स एंट्रीसाठी रिट्रेस्मेण्टची वाट बघतात आणि स्टॉक रेझिस्टन्स लेव्हल पर्यंत रिट्रेस झाल्यानंतर बुलिश सिग्नल भेटताच बाइंग साईड ट्रेड घेतात
हे झालं एन्ट्रीच, आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा
स्टॉप लॉस :
- इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग लोव पॉईंट हा सर्वसाधारणपणे स्टॉप लॉस म्हणून वापरला जातो.
- स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते
डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी | Descending Triangle Chart Pattern in Marathi
डिसेंडिंग म्हणजे उतरता आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोण होय
चार्ट वर तयार होणारा उतरत्या त्रिकोणाचा चार्ट पॅटर्न म्हणजेच डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न.
खालील चित्रात डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न दाखवला आहे
डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा एक डाउनट्रेंड मध्ये तयार होणारा चार्ट पॅटर्न असून स्टॉक जेव्हा बियरीश असतो तेव्हा हा चार्ट पॅटर्न तयार होतो
वरील चित्रात डाउनट्रेण्ड मधील डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न दाखवला आहे
आपण चित्रात बघू शकतो कि स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेण्ड हा डाउनट्रेंड आहे मात्र स्टॉक मधील डाउन मूव्ह थांबली आहे.
काही अंतरावर स्टॉक मध्ये एक सपोर्ट तयार झाल्यासारखा दिसतोय आणि स्टॉकचे स्विंग लोझ एका सरळ रेषेत तयार होत आहेत.
यावरून स्टॉकमध्ये खरेदीला सुरवात झाली आहे किंवा बुल्स ऍक्टिव्ह झाले आहेत असे दिसते.
याउलट सपोर्ट लाईन पासून काही उंचीवर स्टॉक च्या किमतीला अधिक वर जाण्यास अडचण येत असल्याचे दिसते आहे आणि स्टॉक मध्ये लोअर हाईझ तयार होत आहे..
यावरून स्टॉक मध्ये बियर्स पूर्ण ताकदीनिशी सक्रिय असल्याचे जाणवते आहे.
बुल्स आणि बियर्स च्या या स्पर्धेत स्टॉक मध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स लाइन तसेच डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न तयार झाला आहे.
चित्रात दाखवल्याप्रमाणे बियर्सचा विजय झाला असून स्टॉकची किंमत सपोर्ट लाइन ब्रेक करून जोरदार खाली कोसळली आहे.
स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेन्ड डाऊनट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेन्ड हासुद्धा डाऊनट्रेन्ड असल्याने हा एक बियरीश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न आहे.
डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?
एंट्री :
- जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकडाउन झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
- अधिक सुरक्षित एन्ट्रीसाठी तुम्ही रिट्रेस्मेण्टची वाट बघायची आहे आणि बियरीश सिग्नल मिळताच सेल साइड एन्ट्री घ्यायची आहे
आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा
स्टॉप लॉस :
- इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग हाई पॉईंट हा सर्वसाधारणपणे स्टॉप लॉस म्हणून वापरता येऊ शकतो.
- स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते
अशा प्रकारे या लेखात आपण असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न आणि डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न हे दोन्ही चार्ट पॅटर्न सविस्तरपणे बघितले.
शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर होण्यासाठी आपल्याला चार्ट पॅटर्न सोबतच कॅन्डलस्टिक पॅटर्न अनॅलिसिस आणि व्हॉल्युम अनॅलिसिसचे देखील सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा
आपण वेळात वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत
धन्यवाद!!!
चार्ट पॅटर्न विषयी अधिक माहितीसाठी आपण खालील लेख जरूर वाचा.
- हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मराठी । Head and Shoulder Chart Pattern in Marathi
- [४] सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी | [4] Symmetrical Triangle Chart Pattern in Marathi
- डबल टॉप आणि डबल बॉटम चार्ट पॅटर्न मराठी । Double Top and Double Bottom Chart Pattern in Marathi
- [४] रेक्टेंगल चार्ट पॅटर्न मराठी | [4] Rectangle Chart Pattern Marathi
- शेअर मार्केट [२] कॉन्टीनुएशन ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी। Share Market [2] Continuation Triangle Chart Pattern in Marathi
- फ्लॅग चार्ट पॅटर्न मराठी । Flag Chart Pattern in Marathi