निफ्टी आज १००० अंकांनी उसळला
सेन्सेक्स आज ५०० अंकांनी कोसळला.
शेअर बाजार आज ३०० अंकांनी वधारला
मुंबई शेअरबाजारत आज ७९० अंकाची मोठी घसरण झाली
अशा बातम्या रोज आपल्या कानावर येत असतात.
अहो पण हे निफ्टी आणि सेन्सेक्स आहे तरी काय ? शेअर बाजरात मोठी वाढ झाली किंवा मोठी घसरण झाली, म्हणजे झाले तरी काय ?
मित्रांनो, या लेखात आपल्याला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळतील.
आज आपण ओळख करून घेणार आहोत सेन्सेक्स आणि निफ्टीची
चला तर मग सुरुवात करूया
शेअर बाजाराचे निर्देशांक म्हणजे काय? | What is a Stock Market Index?
निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आहेत
निर्देशांक म्हणजे त्या शेअर बाजाराचे प्रतिबिंब होय.
निर्देशांक तयार करण्यासाठी शेअर बाजारातील नोंदणीकृत मोजक्या कंपन्यांची यादी तयार केली जाते.
यादी तयार करतांना कंपनीच्या निवडीसाठी बाजार भांडवल आणि कंपनीच्या उदयोगाचे क्षेत्र असे बरेच निकष असतात.
निर्देशांकातिल कंपन्या या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असतात.
बाजराच्या निर्देशांकातिल या कंपन्या जरी मोजक्या असल्या तरी या कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीतील बदल संपूर्ण शेअर बाजारावर परिणाम करतो.
निर्देशांक वरून आपल्याला शेअर बाजारातील मानसिकता आणि एकूण आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो
भारतात बीएसइ आणि एनएसइ हे २ सर्वात प्रमुख शेअर बाजार आहेत.
आपल्याला भारतीय शेअर बाजाराची माहिती जाणून घ्यायची असल्यास आपण खालील लिंकवर क्लिक करू शकतात
सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा बीएसइचा निर्देशांक आहे तर निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा एनएसइचा निर्देशांक आहे.
निर्देशांक म्हणजेच इंडेक्स होय म्हणजेच सेन्सेक्स हि बीएसइची तर निफ्टी हि एनएसइची इंडेक्स आहे.
मित्रांनो, जेव्हा निर्देशांकात सामील असलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढतात तेव्हा निर्देशांक देखील वाढतो तर शेअरच्या किंमती कमी होतात तेव्हा निर्देशांक देखील कमी होतो.
मित्रांनो, जेव्हा निर्देशांकात सामील असलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढतात तेव्हा निर्देशांक देखील वाढतो तर शेअरच्या किंमती कमी होतात तेव्हा निर्देशांक देखील कमी होतो.
बातम्यांमध्ये आपण शेअर बाजारात वाढ झाली किंवा घसरण झाली असे जे ऐकतो ती वाढ किंवा घसरण म्हणजे निर्देशांकात झालेली वाढ किंवा घसरण होय.
सेन्सेक्स म्हणजे काय? | What is Sensex in Marathi?
सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा बीएसइचा निर्देशांक आहे हे आपण आधीच पाहिले आहे.
सेन्सेक्सची सुरुवात श्री दिपक मोहोनी यांनी १९८६ साली केली.
सेन्सेक्स हा शब्द सेन्सेटिव्ह आणि इंडेक्स अशा २ शब्दांपासून तयार झाला आहे
सेन्सेक्स मध्ये बीएसइ मधील ३० मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
सेन्सेक्स मधिल या ३० कंपन्यांचा समावेश काही निकषांवर आधारित असून सेन्सेक्स मधील या कंपन्याची नावे वेळोवेळी बदलली देखील जातात.
एखादी कंपनी ठरलेल्या निकषांवर पात्र नसेल तर ती कंपनी सेन्सेक्स मधून बाहेर केली जाते आणि तिच्या जागी दुसऱ्या कंपनीचा समावेश केला जातो
सेन्सेक्समध्ये ऊर्जा, बँक,माहिती तंत्रज्ञान, अर्थ, रिअल इस्टेट,ऑटोमोबाईल, मेटल, मीडिया,फार्मा अशा सर्व क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या सामील आहेत.
सेन्सेक्सची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्सचे अंक होते १०० तर आज १० ऑगस्ट २०२१ रोजी निफ्टी ५४,६१७ च्या पुढे आहे.
सेन्सेक्स हा भारतातील सर्वात जुना निर्देशांक आहे आणि लोक त्याला भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब मानतात.
भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करताना तद्द सेन्सेक्सच्या हालचालीवरून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय उद्योग क्षेत्रातील विकास आणि गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्याकडे असणार कल याचा अंदाज करतात.
सेन्सेक्समधील कंपन्या
१. रिलायन्स इंडस्ट्रीज
२. एच डी एफ सी बँक
३. इन्फोसिस
४. एच डी एफ सी
५. आई सी आई सी बँक
६. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
७. कोटक बँक
८. हिंदुस्थान युनिलिव्हर
९. आई टि सी
१०. ऍक्सिस बँक
११. एल अँड टी १२. बजाज फायनान्स
१३. स्टेट बँक ऑफ इंडिया
१४. भारती एअरटेल
१५. एशियन पेंट
१६. एच सी एल टेकनॉलॉजिज
१७ मारुती
१८. महिंद्रा अँड महिंद्रा
१९. अल्ट्राटेक सिमेंट
२० सनफार्मा
२१. टायटन
२२. टेक महिंद्रा २३. नेस्टले इंडिया
२४. बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस
२५. पॉवर ग्रीड
२६. इंडसइंड बँक
२७. टाटा स्टील
२८. एन ती पी सी
२९. बजाज ऑटोमोबाइल्स
३०. ओ एन जी सी
निफ्टी म्हणजे काय? | What is Nifty in Marathi?
निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा एनएसइचा निर्देशांक आहे हे आपण आधीच पाहिले आहे.
निफ्टी हा शब्द नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि फिफ्टी अशा २ शब्दांपासून तयार झाला आहे.
निफ्टी मध्ये एनएसइ मधील ५० मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
निफ्टी मध्ये देखील या ५० कंपन्यांचा समावेश सेन्सेक्स सारख्याच निकषांवर आधारित असून निफ्टी मधील या कंपन्याची यादी दर ६ महिन्यांनी एकदा नव्याने केली जाते जाते.
म्हणजेच एखादी कंपनी ठरलेल्या निकषांवर पात्र नसेल तर ती कंपनी निफ्टी मधून बाहेर जाते आणि तिची जागा दुसरी कंपनी घेते
निफ्टीची सुरुवात झाली तेव्हा निफ्टीचे अंक होते १००० तर आज १० ऑगस्ट २०२१ रोजी निफ्टी १६,३११ च्या पुढे आहे.
निफ्टीची सुरुवात २१ एप्रिल १९९६ रोजी झाली निफ्टीचा १००० ते १६००० अंकाचा प्रवास २५ वर्षांचा आहे.
निफ्टीमध्ये पुढीलप्रमाणे एकूण १२ क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा, उपभोक्ता वस्तू, मनोरंजन आणि माध्यम, आर्थिक सेवा, धातू, फार्मास्युटिकल्स, दूरसंचार, सिमेंट आणि त्याची उत्पादने, ऑटोमोबाईल, कीटकनाशके आणि खते, ऊर्जा आणि इतर सेवा.
निफ्टीमधील कंपन्या
१. रिलायन्स इंडस्ट्रीज ली.
२. एच डी एफ सी बँक
३. इन्फोसिस
४. एच डी एफ सी
५. आई सी आई सी बँक
६. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
७. कोटक बँक
८. हिंदुस्थान युनिलिव्हर
९. आई टि सी
१०. ऍक्सिस बँक
११. एल अँड टी १२. बजाज फायनान्स
१३. स्टेट बँक ऑफ इंडिया
१४. भारती एअरटेल
१५. एशियन पेंट
१६. एच सी एल टेकनॉलॉजिज
१७. मारुती
१८. महिंद्रा अँड महिंद्रा
१९. अल्ट्राटेक सिमेंट
२० सनफार्मा
२१. टायटन
२२. टेक महिंद्रा
२३. नेस्टले इंडिया
२४. बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस
२५. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन
२६. इंडसइंड बँक
२७. टाटा स्टील
२८. एन ती पी सी
२९. बजाज ऑटोमोबाइल्स
३०. ओ एन जी सी
३१. विप्रो
३२. जे एस डब्लू स्टील
३३. हिंदाल्को इंडस्ट्रीज
३४. डिव्हिस लॅबोरेटरीझ
३५. ग्रॅसिम इंडस्ट्रीज
३६. डॉ रेडडीझ लॅबोरेटरीझ
३७. एच डी एफ सी लाइफ इन्शुरन्स कंपनी ली.
३८. एस बी आई लाइफ इन्शुरन्स कंपनी ली.
३९. सिपला
४०. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस
४१. यु पी एल
४२ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन
४३. ब्रिटानिया इंडस्ट्रीज
४४. श्री सिमेंट
४५. हिरो मोटर्स
४६. आयशर मोटर्स
४७. कोल इंडिया
४८. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
४९. टाटा मोटर्स
५०. अदानी पोर्ट्स
मित्रांनो अशाप्रकारे या लेखात आपण सेन्सेक्स आणि निफ्टी या भारतीय शेअर बाजार निर्देशांकाची माहिती घेतली.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला खालील कमेंटबॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.
आपण आपल्या सूचना आणि शंका देखील मला कळवू शकता
आपण सवडीने हा लेख वाचला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो
धन्यवाद!!!
- शेअर मार्केटचा इतिहास मराठी | History of Share Market in Marathi
- भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi
- सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?
- आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?
- डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? मराठी | What is Demat Account in Marathi?
- मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi
- शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi
- अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi
- फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi
- ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi
- स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi
- रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi
- डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi
- बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi
- गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi