सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी | Support and Resistance in Marathi

4.5/5 - (4 votes)

मित्रांनो, शेअरच्या टेकनिकल अनॅलिसिसमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्सला खूप जास्त महत्व आहे.

तसे बघायला गेलं तर चार्टवरील सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्स या फक्त आडव्या-तिरप्या रेषा असतात.

या आडव्या-तिरप्या रेषा आपल्याला स्टॉकमधील ट्रेंड ओळखायला मदत करतात.

सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्समुळे आपल्याला स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी मदत मिळते आणि जास्तीत जास्त सुरक्षित स्टॉप लॉस ठेवता येतो, तसेच योग्य टारगेट प्राइस सुद्धा निश्चित करता येते.

आपल्याला चार्टवर सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्स व्यवस्थितपणे खेचता आल्या तर ट्रेड घेण्यासाठी एक संदर्भ(रेफरन्स) मिळतो.

सपोर्ट-रेझिस्टन्सच्या मदतीने आपण खूप चांगले ट्रेड घेऊ शकतो आणि चांगले ट्रेड म्हणजे भरपूर प्रॉफिट.

तिरप्या सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्सला ट्रेंड लाइन्स असे म्हणतात.

आपण या लेखात फक्त आडव्या सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्सचा अभ्यास करणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

सपोर्ट म्हणजे काय ? | What is Support?

सपोर्ट लाइन हि शेअरच्या चार्टवरील एक महत्वाची लेव्हल होय.

सपोर्ट लाइनपासून शेअरची कोसळणारी किंमत कमी व्हायचं थांबते किंवा सपोर्ट लाइनपासून शेअरची किंमत वाढायला सुरुवात होते.

मित्रांनो सपोर्ट लेव्हल नेहमी सध्याच्या किमतीपेक्षा कमी उंचीवर असते.

खालील चित्रात सपोर्ट आणि सध्याची प्राइस यातील संबंध दाखवला आहे

Support below price min

सपोर्ट झोनजवळ खरेदीदार किंवा बायर्स खूप जास्त ॲक्टिव्ह असतात आणि स्टॉकची डिमांड/मागणी, पुरवठयापेक्षा/ सप्लायपेक्षा खूप जास्त असते.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

रेझिस्टन्स म्हणजे काय? | What is Resistance ?

रेझिस्टन्स लाइन हि शेअरच्या चार्टवरील अशी एक लेव्हल असते कि ज्या लेव्हलपासून वर शेअरची वाढणारी किंमत वाढायचं थांबते किंवा रेझिस्टन्स लाइनपासून शेअरची किंमत कमी व्हायला सुरुवात होते.

रेझिस्टन्स लेव्हल नेहमी सध्याच्या किमतीपेक्षा अधिक उंचीवर असते.

खालील चित्रात सपोर्ट आणि सध्याची प्राइस यातील संबंध दाखवला आहे

Resistanse above price min

रेझिस्टन्स झोनजवळ विक्रेते किंवा सेलर्स खूप जास्त ॲक्टिव्ह असतात आणि स्टॉकचा पुरवठा/सप्लाय, मागणीपेक्षा / डिमांडपेक्षा खूप जास्त असतो.

शेअर्स मधील सप्लाय आणि डिमांड व त्याचा शेअरच्या किमतीवर होणार याविषयी सखोल माहितीसाठी आपण खालील लेख वाचू शकतात.

द लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड

ट्रेण्ड आणि सपोर्ट | Trend and Support

स्टॉक मध्ये जर अपट्रेन्ड असेल तर स्टॉक आपल्या सपोर्ट लेव्हल पासून वरच ट्रेड करतो.

जर स्टॉकमध्ये अपट्रेंड असेल तर स्टॉकमध्ये अधिकाधिक उंचीवर नवनवीन सपोर्ट तयार होत असतात

support and uptrend min

स्टॉक मध्ये जर मजबूत डाउनट्रेन्ड असेल तर स्टॉक आपल्या सपोर्ट लेव्हल तोडत स्टॉकची किंमत अधिकाधिक खाली घसरत जाते

स्टॉक मध्ये जर सध्या डाउनट्रेन्ड असेल तर सपोर्ट लेव्हल पासून स्टॉकचा ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता असते.

support and trend min

ट्रेण्ड आणि रेझिस्टन्स | Trend and Resistance

स्टॉक मध्ये जर अपट्रेन्ड असेल तर स्टॉक आपल्या रेझिस्टन्स लेव्हल तोडत जातो आणि स्टॉकची किंमत अधिकाधिक वाढत जाते.

स्टॉक मध्ये जर अपट्रेन्ड असेल तर स्टॉकचा ट्रेण्ड रेझिस्टन्स लेव्हल पासून रिव्हर्स होण्याची शक्यता असते.

resistance and uptrend min

स्टॉक मध्ये जर डाउनट्रेन्ड असेल तर स्टॉक आपल्या रेझिस्टन्स लेव्हल पासून खालीच ट्रेड करतो.

जर स्टॉकमध्ये डाउनट्रेंड असेल तर स्टॉक अधिकाधिक कमी उंचीवर नवनवीन रेझिस्टन्स तयार होत असतात

resistance and downtrend min

सपोर्ट-रेझिस्टन्स आणि चेंज इन पोलॅरिटी | Support-Resistance and Change in Polarity

चेंज इन पोलॅरिटी हि टेकनिकल अनॅलिसिस मधील खूप महत्वाची संकल्पना आहे.

चेंज इन पोलॅरिटी नुसार स्टॉकमध्ये सपोर्ट लेव्हल ब्रेक झाल्यावर ती सपोर्ट लेव्हल त्या स्टॉकमध्ये रेझिस्टन्सचं काम करते.

याउलट स्टॉकमध्ये रेझिस्टन्स लेव्हल ब्रेक झाल्यावर ती रेझिस्टन्स लेव्हल त्या स्टॉकमध्ये सपोर्टचं काम करते.

खालील चित्रात आपण बघू शकतो कि स्टॉक डाउनट्रेंड मध्ये आहे.

स्टॉकने आपला सपोर्ट ब्रेक केला आहे मात्र ब्रेकडाउन नंतर स्टॉकची किंमत पुन्हा आपल्या सपोर्ट पर्यंत वाढली आहे यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत रिट्रेस्मेण्ट म्हणतो.

चेंज इन पोलॅरिटीच्या नियमानुसार आता स्टॉकच्या सपोर्टच रूपांतर आता रेझिस्टन्स मध्ये झालं असून स्टॉकची प्राइस नव्या रेझिस्टन्स पासून पुन्हा कोसळली आहे

इन पोलॅरिटी 1 min

खालील चित्रात आपण बघू शकतो कि स्टॉक अपट्रेंड मध्ये आहे.

स्टॉकने आपला रेझिस्टन्स ब्रेक केला आहे मात्र ब्रेकआऊट नंतर स्टॉकची किंमत पुन्हा आपल्या रेझिस्टन्स पर्यंत वाढली आहे म्हणजेच रिट्रेस झाली आहे.

चेंज इन पोलॅरिटीच्या नियमानुसार आता स्टॉकच्या रेझिस्टन्सच रूपांतर आता सपोर्टमध्ये झालं असून स्टॉकची प्राइस नव्या सपोर्ट पासून पुन्हा वाढली आहे.

इन पोलॅरिटी min

चेंज इन पोलॅरिटीचा नियम आपल्याला ट्रेडिंगसाठी खूप उपयोगी पडतो.

लेखाच्या शेवटी सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात ते आपण बघणारच आहोत तेव्हा पुढे वाचत रहा.

कॅन्डलस्टिक आणि सपोर्ट-रेझिस्टन्स | Candlesticks and Support-Resistance

ब्रेकडाउन

मी स्वतः ट्रेडिंगसाठी कॅन्डलस्टिक चार्टचा वापर करत असल्याने मी इथे कॅन्डलस्टिकचे उदाहरण घेतले आहे

आपण इथे सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुटणे किंवा ब्रेक होणे हि अतिशय महत्वपूर्ण संकल्पना बघणार आहोत.

खालील चित्रात सपोर्ट ब्रेक झाला हे कसे समजावे ते दाखवले आहे.

support break min

सपोर्ट ब्रेक होण्यालाच शेअर मार्केटच्या भाषेत ब्रेकडाउन असेही म्हणतात.

सपोर्ट ब्रेक होण्यासाठी ज्या कॅन्डलने सपोर्ट ब्रेक केला ती कॅण्डल एक मोठी रेड कॅण्डल असणे गरजेचे आहे.

तसेच या रेड कॅन्डलची क्लोझिंग सपोर्ट लेव्हलपेक्षा कमी उंचीवर किंवा खाली होणे गरजेचे आहे.

ब्रेकआऊट

खालील चित्रात रेझिस्टन्स ब्रेक झाला हे कसे समजावे ते दाखवले आहे

Resistance break min

रेझिस्टन्स ब्रेक होण्यालाच शेअर मार्केटच्या भाषेत ब्रेकआऊट असेही म्हणतात

रेझिस्टन्स ब्रेक होण्यासाठी ज्या कॅन्डलने सपोर्ट ब्रेक केला ती कॅण्डल एक मोठी ग्रीन कॅण्डल असणे गरजेचे आहे.

तसेच या ग्रीन कॅन्डलची क्लोझिंग रेझिस्टन्स लेव्हलपेक्षा अधिक उंचीवर किंवा वर होणे गरजेचे आहे.

सप्लाय-डिमांड झोन आणि सपोर्ट-रेझिस्टन्स | Supply-Demand Zone & Support-Resistance

मित्रांनो सपोर्ट लेव्हल जवळ डिमांड झोन असल्याचे समजले जाते तर रेझिस्टन्स जवळ सप्लाय झोन असल्याचे समजतात.

सप्लाय आणि डिमांड झोनविषयी आपण नवीन लेखात सविस्तर चर्चा करणार आहोत

सपोर्ट जवळ स्टॉकमधील डिमांड स्टॉकमधील सप्लाय पेक्षा जास्त असल्याने स्टॉकची किंमत वाढत जाते याउलट रेझिस्टन्स जवळ स्टॉकमधील सप्लाय स्टॉकमधील डिमांडपेक्षा जास्त असल्याने स्टॉकची किंमत कमी होत जाते

सपोर्ट कसा मार्क करतात | How to Mark Support?

मित्रांनो सपोर्ट मार्क करण्यासाठी आपल्याला चार्टवर मागे जाऊन स्टॉकची किंमत आजच्या अगोदर कधी कमी व्हायचं थांबली होती किंवा कुठून वाढायला सुरुवात झाली होती ते शोधावे लागते.

आपल्यासोबत टाटा स्टीलचा डेलीचार्ट आहे.

खाली मी अपट्रेन्ड मधील स्टॉकच्या डेली चार्टवर सपोर्ट मार्क करून दाखवले आहेत.

चार्टवर हिरव्या रंगाने वेळोवेळी तयार झालेल्या सपोर्ट लेव्हल दाखवल्या आहेत

Support Drawing min

गेल्या काही दिवसापासून टाटा स्टीलचा स्टॉक खूप बुलिश होता, आपण बघू शकतो कि स्टॉक जर अपट्रेन्डमध्ये असेल तर सपोर्ट कसे वरवर सरकत आहेत

खाली टाटा मोटर्सचा डेली चार्ट दाखवला आहे. काही दिवसापासून टाटा मोटर्स डाउनट्रेंडमध्ये आहे.

Tata Motors Downtrend min

आपण बघू शकतो कि स्टॉक मधील सपोर्ट कशाप्रकारे ब्रेक होत आहेत.

रेझिस्टन्स कसा मार्क करतात | How to Mark Resistance?

रेझिस्टन्स मार्क करण्यासाठी आपल्याला चार्टवर मागे जाऊन स्टॉकची किंमत आजच्या अगोदर कधी वाढायची थांबली होती किंवा कुठून कमी व्हायला सुरुवात झाली होती ते शोधावे लागते.

खाली टाटा स्टीलच्या डेली चार्टवर मी डाउनट्रेन्ड मधील स्टॉकच्या चार्टवर रेझिस्टन्स मार्क करून दाखवले आहेत.

चार्टवर लाल रंगाने वेळोवेळी तयार झालेल्या रेझिस्टन्स लेव्हल दाखवल्या आहेत.

Resistance min

अगोदरच सांगिल्याप्रमाणे गेल्या काही दिवसापासून टाटा स्टीलचा स्टॉक खूप बुलिश होता आपण बघू शकतो कि स्टॉक जर अपट्रेन्डमध्ये असल्याने टाटा स्टीलच्या स्टॉकने कसे रेझिस्टन्स ब्रेक केले आहेत.

Tata Motors Downtrend Resistance min

आपण चार्टवर बघू शकतो कि स्टॉक मधील रेझिस्टन्स कशाप्रकारे खाली-खाली सरकत आहेत.

मला आशा आहे कि सपोर्ट आणि रेझिस्टन्स विषयी पुरेशी माहिती देण्यास मी यशस्वी झालो असेल.

आता आपण बघू सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हलचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करायचा

सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हलचा वापर ट्रेडिंगसाठी करण्यासाठी आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नची मदत घ्यावी लागणार आहे.

सपोर्टचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात? | How to Use Support in Treding?

स्टॉक जर अपट्रेन्ड मध्ये असेल तर आपण सपोर्टचा वापर करून ट्रेंडमध्ये एन्ट्री घेऊ शकतो तसेच स्टॉप लॉस कुठे लावायचा ते ठरवू शकतो.

एन्ट्री: स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असेल आणि सपोर्टजवळ जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला तर आपल्याला बायिंग करायचं आहे.

support entry min

टारगेट: टारगेटसाठी आपण सर्वात जवळची रेझिस्टन्स लेव्हल टारगेट प्राइस ठेवायची आहे.

स्टॉप लॉस: स्टॉप लॉस आपण सर्वात जवळचा सपोर्ट किंवा स्विंग लो ठेवायचा आहे.

जर स्टॉक सपोर्ट तोडून खाली कोसळला तर आपल्याला सेलिंग करायचं आहे.

एन्ट्री : सेलिंग करण्यासाठी आपल्याला सपोर्ट ब्रेक झाल्यावर रिट्रेस्मेण्टची वाट बघायची आहे आणि बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच शॉर्ट करायचं आहे

support breakdown entry min

स्टॉप लॉस: स्टॉप लॉस आपण सर्वात जवळचा सपोर्ट किंवा स्विंग हाइ ठेवायचा आहे.

टारगेट: टारगेटसाठी आपण सर्वात जवळची सपोर्ट लेव्हल टारगेट प्राइस ठेवायची आहे.

याशिवाय सपोर्ट जवळ जर ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल जसे कि रिव्हर्सल चार्ट पॅटर्न (डबल बॉटम, ट्रिपल बॉटम) किंवा रिव्हर्सल कॅन्डलस्टिक सिग्नल तयार झाल्यास देखील आपण बायिंग ट्रेड घेऊ शकतो.

खालील चित्रात स्टॉक मधील डाउनट्रेंड सपोर्ट पासून कसा रिव्हर्स होतो ते दाखवले आहे

support rivarsal min

आता आपण रेझिस्टन्स चा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात त्याची ओळख करून घेऊ

रेझिस्टन्सचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात? | How to Use Resistance in Treding?

स्टॉक जर डाउनट्रेन्ड मध्ये असेल तर आपण रेझिस्टन्सचा वापर करून ट्रेंडमध्ये एन्ट्री घेऊ शकतो तसेच स्टॉप लॉस कुठे लावायचा ते ठरवू शकतो.

एन्ट्री: स्टॉक डाउनट्रेन्ड मध्ये असेल आणि रेझिस्टन्सजवळ जर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला तर आपल्याला सेलिंग करायचं आहे.

Resistance Entry min

टारगेट: टारगेटसाठी आपण सर्वात जवळची सपोर्ट लेव्हल हि टारगेट प्राइस ठेवायची आहे.

स्टॉप लॉस: स्टॉप लॉस आपण सर्वात जवळचा रेझिस्टन्स किंवा स्विंग हाइ ठेवायचा आहे.

जर स्टॉक रेझिस्टन्स तोडून वर उसळला तर आपल्याला बायिंग करायचं आहे.

Resistance breakout and entry min

एन्ट्री : बायिंग करण्यासाठी आपल्याला रेझिस्टन्स ब्रेक झाल्यावर रिट्रेस्मेण्टची वाट बघायची आहे आणि बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच बाय (खरेदी) करायचं आहे

स्टॉप लॉस: स्टॉप लॉस आपण सर्वात जवळचा सपोर्ट किंवा स्विंग लो ठेवायचा आहे.

टारगेट: टारगेटसाठी आपण सर्वात जवळची रेझिस्टन्स लेव्हल टारगेट प्राइस ठेवायची आहे.

याशिवाय रेझिस्टन्स जवळ जर ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल जसे कि रिव्हर्सल चार्ट पॅटर्न (डबल बॉटम, ट्रिपल बॉटम) किंवा रिव्हर्सल कॅन्डलस्टिक सिग्नल तयार झाल्यास देखील आपण सेलिंग ट्रेड घेऊ शकतो.

खालील चित्रात स्टॉक मधील अपट्रेंड रेझिस्टन्स पासून कसा रिव्हर्स होतो ते दाखवले आहे

Resistance reversal min

अशाप्रकारे आपण आज सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय आहे ते बघितले, सपोर्ट-रेझिस्टन्स मार्क कसे करायचे ते बघितले आणि सपोर्टरेझिस्टन्सचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करायचा त्याची ओळख करून घेतली.

मित्रांनो या लेखात दिलेली सपोर्ट आणि रेझिस्टन्सची माहिती आपल्याला यशस्वी ट्रेडर होण्यासाठी पुरेशी नसून आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आणि व्हॉल्युम ॲनालिसिसचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

त्यासाठी आपण इतर लेख देखील जरूर वाचावे जेणेकरून आपल्याला ट्रेड करण्यास मदत होईल

आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.

आपल्याला सपोर्ट-रेझिस्टन्सची अजून सविस्तर माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment