भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi

3.7/5 - (4 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या लेखात आपलं स्वागत आहे.

मागील लेखात आपण जागतिक शेअर मार्केटचा इतिहास बघितला, जगातला पाहिलं शेअर मार्केट बघितलं, पहिला स्टॉक एक्सचेंज पाहिला आणि अगदी पहिला ट्रेड झालेला स्टॉक देखील बघितला.

तुम्ही जर तो लेख वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण तो लेख वाचू शकता

इतिहास जागतिक शेअर मार्केटचा

या लेखात आपण भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात डोकावणार आहोत.

मित्रांनो, आपला भारत देश इतर गोष्टीप्रमाणे शेअर मार्केट आणि बाजार भांडवलाच्या बाबतीतही समृद्ध आहे

आपण बीएसइ आणि एनएसइ हि नावे ऐकली असतीलच पण भारतात आजरोजी एकूण २९ शेअर बाजार (स्टॉक एक्सचेन्ज) असून त्यातील ८ राष्ट्रीय शेअर बाजार (नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज) असून २१ स्थानिक शेअर बाजार (रिजनल स्टॉक एक्सचेन्ज) आहेत.

चला तर मग ओळख करून घेऊया भारतीय शेअर बाजाराची

भारतात शेअर मार्केटची सुरुवात | Beginning of Indian Share Market in Marathi

भारतातील शेअर मार्केटची अनौपचारिक सुरवात अगदी १८५० च्या आसपासच सुरु झाली होती जेव्हा फक्त ५ स्टॉक ब्रोकर्स मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील एका वडाच्या मोठ्या झाडाखाली व्यवहार करत असत.

हे वडाचे झाड म्हणजे हॉर्निमन सर्कल होय, ते वडाचे झाड आजदेखील आहे

त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी, बँक आणि सूत गिरण्या (कॉटन मिल्सचे) शेअर्स ट्रेड होत असत

१८६१ साली अमेरिकन गृह युद्ध (अमेरिकन सिव्हिल वॉर )सुरु झाले आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मालाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासू लागला.

त्याकाळी भारतात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन आणि प्रक्रिया होत असे.

आपल्या भारतातून तेव्हा मोठ्या प्रमाणावर कापूस आणि कापसाच्या मालाची निर्यात होत असे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवड्यामुळे भारतीय मालाला भरपूर मागणी वाढली आणि मालाच्या किमती थेट ५ ते ६ पट वाढल्या.

ओघानेच भारतातील कापूस उत्पादन आणि सूत गिरण्यांच्या क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज भासू लागली आणि गुंतवणुकीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले.

अशावेळी कॉटन किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेमचंद रॉयचंद या भारतीय गृहस्थाला शेअर्सच्या माध्यमातून भांडवल उभे करण्याची कल्पना सुचली.

अशाप्रकारे शेअरच्या माध्यमातून हळूहळू बाजारातील गुंतवणूक वाढू लागली आणि शेअर ब्रोकर्स देखील वाढू लागले.

काही काळानंतर अमेरिकन युद्धाचा शेवट झाला.

काही दिवसांनी ट्रेडर्सची संख्या पुष्कळ वाढल्याने पुढे ट्रेडिंगचे ठिकाण मीडोज स्ट्रीट जंक्शन येथे स्थलांतरित झाले.

मुंबईतील मीडोज स्ट्रीट जंक्शन आज महात्मा गांधी रोड म्हणून ओळखले जाते.

पुढे जाऊन १८७४ साली दलाल स्ट्रीट या ठिकाणी नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनची स्थापना झाली.

नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन हि भारतीय शेअर मार्केटची अनौपचारिक स्थापना होय.

अशाप्रकारे आपण भारतीय शेअर मार्केटचा पाया कसा रोवला गेला ते बघितले.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

बीएसइ (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) | Bombay Stock Exchange in Marathi

१८७५ मध्ये प्रेमचंद रॉयचंद यांच्या मार्गदर्शनाखाली नेटिव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनचे रूपांतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये झाले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील तसेच अवघ्या आशिया खंडातील सर्वात हिला शेअर बाजार होय..

१९२८ पर्यंत बीएसइचा कारभार हा असाच इथे-तिथे सुरु होतो.

१९२८-१९३० दरम्यान बीएसइच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि दलाल स्ट्रीट येथे १९३० पासून बीएसइचे कामकाज आपल्या इमारतीत चालू झाले.

३१ ऑगस्ट १९५७ रोजी बीएसई हे आशियातील सर्वात जुने आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट १९५६ अंतर्गत कायमस्वरूपी मान्यता मिळवणारे पहिले स्टॉक एक्सचेंज ठरले.

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशियाचा पहिला आणि जगातील सर्वात वेगवान स्टॉक एक्सचेंज आहे ज्याचा वेग ६ मायक्रो सेकंद आहे.

बीएसई नंतर १८९४ मध्ये अहमदाबाद स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आणि कापड गिरण्यांच्या शेअर्सचा व्यापार सुरु झाला.

कलकत्ता स्टॉक एक्स्चेंजने १९०८ मध्ये कामकाज सुरू केले.

कलकत्ता स्टॉक एक्स्चेंजमध्ये लागवड आणि जूट मिलच्या शेअर्सचा व्यापार सुरू झाला.

त्यानंतर मद्रास स्टॉक एक्सचेंजची स्थापना १९२० मध्ये झाली.

अशाप्रकारे भारतात विविध ठिकाणी शेअर मार्केटचे कामकाज सुरु झाले.

अधिक माहितीसाठी तुम्ही बीएसईच्या वेबसाइटला भेट देऊ शकता

एनएसइ (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) | National Stock Exchange in Marathi

१९९२ साली भारतात स्टॉक मार्केट मधील पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी एनएसइची स्थापना झाली आहे.

एनएसइ म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज होय.

एनएसइ महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थित आहे.

एनएसइची सुरुवात १९९२ साली एक कर भरणा करणारी कंपनी म्हणून झाली होती.

पुढे पी.व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री असतांना १९९३ साली एनएसइला सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट १९५६ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यता मिळाली

एनएसइ हि भारतातील सर्वात अलीकडील स्टॉक एक्सचेंज असून जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटीव्ह एक्सचेंज आहे.

एनएसइचे बाजार भांडवल ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पेक्षा जास्त आहे.

एनएसइ ही देशातील पहिली आधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली आहे.

ट्रेडिंग सदस्यत्व दलालांच्या गटापुरते मर्यादित करण्याऐवजी, एनएसईने हे सुनिश्चित केले आहे की जो कोणी पात्र, अनुभवी आणि किमान आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो त्याला शेअर बाजारात व्यापार करण्याची परवानगी मिळावी.

अधिक माहितीसाठी तुम्ही एनएसइच्या वेबसाइटला भेट देऊ शकता

आर्थिक वर्ष २०२० अखेरीस जवळपास ७४०० कंपन्या एनएसइ आणि बीएसइ मध्ये समाविष्ट आहेत.

बीएसइमध्ये ५४०० पेक्षा जास्त कंपन्या असून एनएसइ मध्ये २००० पेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश होतो

मित्रांनो, अशाप्रकारे आपण या लेखात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली, एनएसइ आणि बीएसइ या स्टॉक एक्सचेंजची माहिती घेतली.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला कमेन्ट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.

आपण आपला मौल्यवान वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे

शेअर मार्केटविषयी आणखी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा :

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment