मित्रांनो, या लेखात आपण येत्या आठवड्यात येणाऱ्या ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ली कंपनीच्या आई पि ओ बद्दल माहिती घेणार आहोत.
आपण इथे ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ली कंपीनीची माहिती देखील बघणार आहोत जेणेकरून आपल्याला आई पि ओ घ्यावा कि नाही याचा निर्णय घेण्यास मदत होईल.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस या आई पि ओ च्या माध्यमातून १४०० ते १५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे
एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी १०६० कोटी रुपयांचे शेअर्स हे नवीन असून ६३ लाख शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत
शेअर्सची अलॉटमेंट ४ ऑगस्ट २०२१ रोजी केली जाणार असून ५ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतील
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा स्टॉक या महिन्याच्या शेवटी म्हणजेच ०६ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस सब्सक्रिप्शन स्टेटस | Glenmark Life Sciences Subscription Status
खुला झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा ४४. १७ पट इतका सबस्क्राइब झाला असून त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे
२७ जुलै २०२१ | २८ जुलै २०२१ | २९ जुलै २०२१ | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /Institutional Investors) | ०० पट | १.३८ पट | ३६.९७ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स / Non-Institutional Investors /NII’S) | ० ८६ पट | ३. ३९ पट | १२२. ५४पट |
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors ) | ५.७० पट | ९. २८ पट | १४. ६३पट |
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आई पि ओ च्या एकूण शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे आहे
एकूण शेअर्स पैकी ५० % शेअर्स हे गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /Institutional Investors) साठी उपलब्ध असणार आहे.
एकूण शेअर्स पैकी १५% शेअर्स संस्थात्मक नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी (नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /NII’S)उपलब्ध असणार आहे
एकूण शेअर्स पैकी ३५% शेअर्स हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)उपलब्ध असणार आहे
या आई पि ओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ६९५ रुपये आणि कमाल किंमत ७२० रुपये असणार आहे
एका लॉटमधील शेअरची संख्या हि असणार आहे. याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २० * ६८५ =१३,९०० रुपये ते २० * ७२० = १४,४०० रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा हि जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी असणार आहे.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आई पि ओ ची तारीख | Glenmark Life Sciences IPO Release Date
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आई पि ओ २७ जुलै २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख 29 जुलै २०२१ हि असणार आहे अशाप्रकारे ३ दिवस आई पि ओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आई पि ओ चे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Prmium of Glenmark Life Sciences IPO
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आई पि ओ चे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास ३०० रुपये म्हणजेच ४०% इतके जास्त असण्याची शक्यता आहे.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस शेअर मार्केटमध्ये १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीला लिस्ट होण्याची शक्यता आहे
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस कंपनीची माहिती | Information of Glenmark Life Sciences
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस हि ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स (API) च्या विकास आणि उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे.
कंपनी व्यावस्थापनातील महत्वाची नावे पुढीलप्रमाणे आहेत
- ग्लेन सलदन्हा (चेअरमन आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर)
- व्ही एस मणी (नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर)
- यासिर रौजी (मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर)
- सुमंत्रा मित्रा (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि वाइस प्रेसिडेंट)
- भावेश पुजारा (सिनिअर वाइस प्रेसिडेंट आणि चीफ फायनान्स ऑफिसर)
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची प्रॉडक्ट्स हृदयरोग, वेदनाशामक, पोटाचे विकार, डायबेटीस इ गोष्टींवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषध तयार करण्यासाठी केला जातो.
३१ मार्च २०२१ पर्यंत जगातील प्रमुख २० जेनेरिक कंपन्यांपैकी १६ कंपन्या ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसच्या ग्राहक आहेत
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस भारतात तसेच युरोप, अमेरिका, जपान असे जगभरातील मोठमोठ्या मार्केटमध्ये सहभागी आहे
साध्य कंपनीचा कारभार प्रमुख ४ ठिकाणाहून चालतो यात महाराष्ट्रातील कुरकुंभ आणि मोहोळ तसेच गुजरात मधील दहेज आणि अंकलेश्वर या ठिकाणांचा समावेश होतो.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस कंपनीची ३१ मार्च २०२१ रोजी उत्पादन क्षमता ७२६.६KL इतकी आहे.
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ची उजवी बाजू | Positives of Glenmark Life Sciences
- क्रॉनिक विकारांच्या उपचारातील क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स(API) उत्पादनात कंपनी अव्वल आहे
- जगभरातील प्रमुख जेनेरिक कंपन्यांशी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे चांगले व्यावसायिक संबंध आहेत.
- कंपनीकडे उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आहे
- कंपनीचे आत्तापर्यंतचे ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे
- सुरक्षित उत्पादन व्यवस्था, कमीत कमी किंमत, जगभर उत्पादनांचा प्रसार आणि उत्पादन क्षमतेत वाढ यावर कंपनीचा भर असल्याचे दिसून येते
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची डावी बाजू | Negatives of Glenmark Life Sciences
- ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा मोठा व्यवसाय हा मोजक्या प्रमुख ग्राहकाकडून येत असल्याने कुठलाही ग्राहक कमी झाल्यास कंपनीच्या आर्थिक कारभारावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
- कंपनीचे प्रमोटर्स आणि डिरेक्टर्स काही कायदेशीर बाबीमध्ये गुंतलेले असल्याने त्यांच्या विरोधातील निकालाचा परिणाम शेअरच्या किमतीवर होऊ शकतो
- कंपनीच्या नफ्यातील बराच मोठा भाग परदेशातील निर्यातीतून येत असल्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिणाम कंपनीच्या कारभारावर होऊ शकतो
आई पि ओ खुला होणार | २७ जुलै २०२१ |
आई पि ओ बंद होणार | 29 जुलै २०२१ |
शेअर्स अलॉटमेंट आणि रींफंड | ४ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स डिमॅट अकाउंट मध्ये जमा होणार | ५ ऑगस्ट २०२१ |
स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार | ६ ऑगस्ट २०२१ |
स्टॉकची किमान किंमत | ६९५ रुपये |
स्टॉकची कमाल किंमत | ७२० रुपये |
लॉट साइझ | २० |
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात