मित्रांनो, या लेखात आपण येत्या आठवड्यात येणाऱ्या क्रस्ना डायग्नॉस्टिक्स ली कंपनीच्या आईपिओ बद्दल माहिती घेणार आहोत.
आपण इथे क्रस्ना डायग्नॉस्टिक्स ली कंपीनीची माहिती देखील बघणार आहोत जेणेकरून आपल्याला आईपिओ घ्यावा कि नाही याचा निर्णय घेण्यास मदत होईल.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स या आई पि ओ च्या माध्यमातून जवळपास १२१३.३३ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे
एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी ४०० कोटी रुपयांचे शेअर्स हे नवीन असून ८१३.३३ कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीच्या प्रमोटर्सकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत
क्रस्ना डायग्नॉस्टिक्सचा स्टॉक या महिन्याच्या मध्यात म्हणजेच १७ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्सचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स सब्सक्रिप्शन स्टेटस | Krsnaa Diagnostics IPO Subscription Status
आईपीओ खुला झाल्यानंतर अखेरच्या दिवशी ६४.३८ पट सबस्क्राइब झाला
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ४९.८३ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | ११६.३० पट |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | ४१.९५ पट |
एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी ४०० कोटी रुपयांचे म्हणजेच ४१,९२,८७२ शेअर्स हे नवीन असून ८१३.३३ कोटी रुपयांचे म्हणजेच ८५,२५,५२० शेअर्स कंपनीच्या प्रमोटर्सकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत.
उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.
शेअर्सची उपलब्धता | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ७५% |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | १५% |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | १०% |
या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ९३३ रुपये आणि कमाल किंमत ९५४ रुपये असणार आहे
एका लॉटमधील शेअरची संख्या हि १५ असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १५ *९३३ =१३,९९५ रुपये ते १५ * ९५४ = १४,३१० रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा हि जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८६,०३० रुपये इतकी असणार आहे.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओ ची तारीख | Krsnaa Diagnostics IPO Release Date
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओ ४ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ६ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आई पि ओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Krsnaa Diagnostics IPO
सध्या मार्केटमध्ये क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम ४२० रुपये ते ४३० रुपये असल्याचे समजते
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओचा उद्देश | Objectives of Krsnaa Diagnostics IPO
- क्रस्ना डायग्नॉस्टिक्स, आईपिओद्वारे उभे राहणाऱ्या भांडवलातून पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यात नवीन डायग्नॉस्टिक सेंटर्स उभे करण्यासाठी करणार असल्याचे समजते
- आईपिओ मधून मिळणाऱ्या भांडवलातून कंपनीला कर्जाची परतफेड आणि आगाऊ पेमेंट करण्यासाठी देखील मदत मिळणार आहे
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स कंपनीची माहिती | Information of Krsnaa Diagnostics
क्रस्ना डायग्नॉस्टिक्सची ली. २०१० पासून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
कंपनीचे प्रमोटर्स: श्री राजेंद्र मुथा
कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस पुणे इथे असून, कार्यालयाचा पत्ता खालीलप्रमाणे आहे
२४३, अ हिस्सा क्र ६, सी टी एस क्र ४५१९, ४५१९/१ चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड, तालुका हवेली जि पुणे
३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीचे देशभरात, १३ राज्यात जवळपास १,८०० डायग्नॉस्टिक सेंटर्स आहेत.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स कंपनी रेडिओलॉजी ,पॅथॉलॉजी, टेलेरेडिओलॉजी इ अशा विविध सेवा पुरवते.
कंपनीच्या ग्राहक वर्गात मुख्यत्वे प्रायव्हेट हॉस्पिटल्स, पब्लिक हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर्स इ चा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पुणे येथे कंपनीची भारतातील सर्वात मोठ्या टेलेरेडिओलॉजी लॅब पैकी एक लॅब असून तिथे मोठया प्रमाणावर एक्स-रे, एम आर आइ आणि सी टी स्कॅन्स करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्सची उजवी बाजू | Positives of Krsnaa Diagnostics
- आर्थिक स्तरावर कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असून त्यात सातत्य आहे.
- भारतातील १३ राज्यात असणारा कंपनीचा विस्तार हि जमेची बाजू.
- स्वस्त किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रसिद्ध
- आरोग्य सेवेच्या विविध क्षेत्रात कंपनीचे असणारी उपस्थिती : रेडिओलॉजी ,पॅथॉलॉजी, टेलेरेडिओलॉजी इ.
थोडक्यात महत्वाचे | All Important
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपिओ | १२१३.३३ कोटी रुपये |
किमान किंमत | ९३३ रुपये |
कमाल किंमत | ९५४ रुपये |
लॉट साईझ | १५ |
एकूण गुंतवणूक | १३,९९५ रुपये ते १४,३१० रुपये |
आईपिओ खुला होणार | ४ ऑगस्ट २०२१ |
आईपिओ बंद होणार | ६ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स इश्यू होणार | ११ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | १३ ऑगस्ट २०२१ |
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | १७ ऑगस्ट २०२१ |
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स लि.
आणखी आईपीओ
देवयानी इंटरनॅशनल आईपीओ, ४ ऑगस्ट २०२१, केएफसी (KFC), पिझ्झा हट(Pizza Hut), कोस्टा कॉफी(Costa Coffe)