मित्रांनो, येत्या आठवड्यात केमप्लास्ट सनमार लि. कंपनीचा आईपिओ येत आहे.
केमप्लास्ट सनमार हा दक्षिण भारतातील अग्रगण्य सनमार ग्रुप कंपनीचा मोठा आइपीओ आहे.
आईपिओ च्या माध्यमातून केमप्लास्ट सनमार जवळपास ३८५० कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ असून यात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे
केमप्लास्ट सनमारचा स्टॉक या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
केमप्लास्ट सनमारचा स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.
केमप्लास्ट सनमार आईपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Chemplast Sanmar IPO Subscription Status
खुला झाल्यानंतर नुवोको विस्टास आइपीओ पहिल्या दिवशी ०.१६ पट सबस्क्राइब झाल्याचे समजते
सब्सक्रिप्शन स्टेटस | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | २.७० पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | १.०३ पट |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | २.२९ पट |
एकूण ३,८५० कोटी रुपयांपैकी १३०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्याने विक्रीस उपलब्ध (फ्रेश इश्यू) आहे, तर २५५० कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल ) उपलब्ध केले आहेत.
उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.
शेअर्सची उपलब्धता | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ७५% |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | १५% |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | १०% |
केमप्लास्ट सनमार शेअरची दर्शनी किंमत हि ५ रुपये आहे.
या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ५३० रुपये आणि कमाल किंमत ५४१ रुपये असणार आहे
एका लॉटमधील शेअरची संख्या हि २७ असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २७ * ५३० =१४,३१०रुपये ते २७ * ५३० = १४,६०३ रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,३१०रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८९,८९१ रुपये इतकी असणार आहे.
केमप्लास्ट सनमार आईपिओ ची तारीख | Chemplast Sanmar IPO Release Date
केमप्लास्ट सनमार आईपिओ १० ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख १२ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
केमप्लास्ट सनमार शेअर्सची अलॉटमेंट १८ ऑगस्ट २०२१ रोजी चालू होणार असून २३ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर २४ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
केमप्लास्ट सनमार आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Chemplast Sanmar IPO
सध्या मार्केटमध्ये केमप्लास्ट सनमार आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम ३० रुपये असल्याचे समजते
केमप्लास्ट सनमार आईपिओचा उद्देश | Objectives of Chemplast Sanmar IPO
- नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची पूर्ण परतफेड करणे
- दैनंदिन आर्थिक व्यवहार
केमप्लास्ट सनमार कंपनीची माहिती | Information of Chemplast Sanmar
१९८५ साली सुरु झालेली केमप्लास्ट सनमार हि स्पेशालिटी केमिकल उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे.
सनमार होल्डिंग्स (SHL) हि केमप्लास्ट सनमारची प्रमोटर कंपनी आहे.
कंपनीच्या संकेतस्थळानुसार केमप्लास्ट सनमार हि ५० वर्षाहून अधिक काळापासून केमिकल उद्योगाच्या क्षेत्रात कार्यरत आहे
केमप्लास्ट सनमार ऍग्रोकेमिकल्स, पीव्हीसी रिझाइन, फार्मास्युटिकल केमिकल्स, कॉस्टिक सोडा, शीतवायू (रेफ्रिजरेन्ट), हायड्रोजन पेरॉक्सीड, इ विविध प्रॉडक्ट तयार करते.
कंपनीचे ४ प्लॅन्ट असून त्यातील ३ तामिळनाडू राज्यातील मेत्तूर, बेरींगला, आणि कुडालोर येथे आहेत तर एक प्लॅन्ट हा पॉंडिचेरी येथील करैकल इथे आहे
केमप्लास्ट सनमार उजवी बाजू | Positives of Chemplast Sanmar
- उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन हि केमप्लास्ट सनमारची जमेची बाजू आहे
- स्पेशालिटी पेस्ट्स पीव्हीसी उत्पादन क्षमतेच्या बाबतीत केमप्लास्ट सनमार हि भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे
- हायड्रोजन पेरॉक्सीड तयार करणारी दक्षिण भारतातील सर्वात मोठी कंपनी.
- कॉस्टिक सोडा तयार करणारी ३ क्रमांकाची कंपनी
- केमप्लास्ट सनमार हि सनमार होल्डिंग्स (SHL) या दक्षिण भारतातील अग्रगण्य कंपनीचा हिस्सा आहे
थोडक्यात महत्वाचे | All Important
केमप्लास्ट सनमार आईपिओ | ३८५० कोटी रुपये |
किमान किंमत | ५३० रुपये |
कमाल किंमत | ५४१ रुपये |
लॉट साईझ | २७ |
एकूण गुंतवणूक | १४,३१० रुपये ते १४,६०३ रुपये |
आईपिओ खुला होणार | १० ऑगस्ट २०२१ |
आईपिओ बंद होणार | १२ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स इश्यू होणार | १८ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | २३ ऑगस्ट २०२१ |
केमप्लास्ट सनमार शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | २४ ऑगस्ट २०२१ |
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात
आणखी आईपीओ