नमस्कार मित्रांनो,
पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे.
आपल्याला शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग शिकायचंय?
पार्ट टाइम ट्रेडिंग करायचं आहे??
शेअर मार्केट शिकून पैसे कमवायचे आहेत ???
मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केट शिकून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस किंवा फंडामेंटल ॲनालिसिस येणे खूप गरजेचे आहे.
शेअर्सच्या टेकनिकल ॲनालिसिसमध्ये कॅन्डलस्टिक चार्ट्सला खूप महत्व आहे.
असा हा कॅन्डलस्टिक चार्ट ज्या कॅन्डलस्टिक पासून तयार होतो त्या कॅन्डलस्टिकची सखोल माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कॅन्डलस्टिक विषयी माहिती मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया!
कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे काय ? | What is Candlestick Chart?
कॅन्डलस्टिक चार्ट्स हे शेअर्स बाजारातील शेअर्सच्या किमतीतील चढ-उतार अभ्यास करण्यासाठीचे एक साधन किंवा पद्धत आहे.
कँडलस्टिक चार्ट्स हे शेअर्सच्या टेकनिकल ॲनालिसिसचे सर्वाधिक लोकप्रिय साधन असून शेअर्स मार्केट मध्ये रस असणाऱ्या सर्वांनाच कँडलस्टिक चार्ट माहित असतो.
सोबतच्या चित्रात (अ)आपण कँडलस्टिक चार्ट बघू शकतात.
मित्रांनो चार्टवर ज्या लाल-हिरव्या रंगाच्या पट्टीसारख्या दिसणाऱ्या आहेत त्या आहेत कॅण्डल.
अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहान-मोठ्या, लाल-हिरव्या, चढत्या-उतरत्या कँडलस्टिक्स मिळून बनतो तो हा कँडलस्टिक चार्ट.
या चार्टच्या फक्त निरीक्षणातून आपण शेअरची किंमत वर जाणार कि खाली येणार याचा अंदाज बांधायचा असतो आणि त्या शेअरमध्ये खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा निर्णय घ्यायचा असतो.
कॅन्डलस्टिक्सला सामान्य भाषेत फक्त कॅण्डल म्हणायची पद्धत आहे.
तर अशी हि कॅन्डलस्टिक किंवा कॅण्डल म्हणजे आहे तरी काय ? कशा बरं तयार होतात या लाल-हिरव्या कॅण्डल्स?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.
कॅण्डल किंवा कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? | What is Candle or Candlestick?
कॅण्डल हि कोणत्याही शेअरची एका ठराविक कालावधीत झालेली किंवा होणारी हालचाल दाखविण्याची एक पद्धत आहे.
सोबतच्या चित्रात कॅन्डलस्टिक व कॅन्डलस्टिकची महत्वाची अंगे दाखवली आहेत.
कॅन्डलस्टिकच्या या सर्व भागांची माहिती आपण लेखात पुढे बघणारच आहोत पण त्यापूर्वी आपण थोडं कॅन्डलिस्टकच्या इतिहासात डोकावून बघणार आहोत.
मित्रांनो, कॅन्डलस्टिक चार्ट जितके उपयुक्त आहेत तितकाच त्यांचा इतिहास देखील भारी आहे बरं का.
चला तर मग बघूया कॅन्डलस्टिक या अनोख्या पद्धतीचा शोध कोणी बरं लावलं ? कशी झाली कॅन्डलस्टिक चार्टच्या वापराची सुरुवात ?
कॅण्डलस्टीक्सचा इतिहास ? | History of andlestick charting?
कॅण्डलस्टीक्सचा शोध १८व्या शतकात जपान देशात लागला.
कॅण्डलस्टीक्स चार्टच्या वापराची सुरुवात सर्वप्रथम जपानमध्ये ‘सकाता’ या बाजारात झाली असे समजले जाते.
कॅण्डलस्टीक्सच्या शोधाचे श्रेय तांदळाचे व्यापारी मूनहीसा होनमा (१७२४-१८०३) यांना दिले जाते.
श्री मूनहीसा होनमा यांच्या विषयी अधिक माहितीसाठी लिंकवर आपण क्लिक करू शकता
कॅण्डलस्टीक्सची ओळख पाश्चिमात्य जगाला ‘स्टीव्ह निसान’ यांच्या ‘जपानीझ कॅण्डलस्टीक्स चार्ट टेकनिक्स’ या पुस्तकातून झाली आणि आज जगभर हि पद्धत टेकनिकल ॲनालिसिससाठी सर्वत्र वापरली जाते.
कॅण्डलस्टीक्सचा कालावधी (टाईमफ्रेम) | Time frame of Candlesticks
कॅण्डलस्टीक्स या १ मिनिट इतक्या कमी तर ते १ वर्ष इतक्या मोठ्या कालावधीच्या वापरल्या जातात. कॅण्डलस्टीक्स साठीची टाईमफ्रेम हि आपल्या ट्रेडिंग स्टाईलला योग्य असावी लागते.
इंट्राडे ट्रेडर्स कमी वेळेच्या टाईमफ्रेम जसे कि १मि, ३मि ,५मि १५मि आणि १ दिवस (डे /Day ) वापरतात
स्विंग ट्रेडर्स मध्यम वेळेच्या टाईमफ्रेम जसे कि १५मि, ३०मि ,१तास १ दिवस(डे /Day ) आणि १ सप्ताह (वीक /week )वापरतात
पोझिशनल ट्रेडिंगसाठी मोठ्या टाईमफ्रेमला पसंती दिली जाते जसे कि १ दिवस(डे /Day ) , १ सप्ताह (वीक /week ) आणि १ माह (मंथ /month )
हा लेख मी आपल्याला कॅन्डलस्टिकची ओळख करून देण्यापुरताच मर्यादित ठेवला असून, कॅन्डलस्टिक चार्टवर कोणती टाइमफ्रेम वापरावी याची माहिती आपण दुसऱ्या लेखात अगदी सविस्तरपणे बघणार आहोत.
आपल्याला आता कॅन्डलस्टिकची पुरेशी ओळख झाली असेलच, आता आपण कॅन्डलस्टिकची थोडी खोलवर माहिती घेणार आहोत.
कॅण्डलस्टीक्सचे घटक आणि त्यांचा अर्थ ? | Constituents of Candlesticks and Their Meaning?
आता आपण कॅण्डलस्टीक्सचे सर्व घटक थोडक्यात बघू, कॅण्डलस्टीक्स आपल्याला ठरलेल्या कालावधीसाठी खालील माहिती पुरवतात
१. ओपन प्राईस (आरंभीची किंमत/Open Price)
शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची अगदी सुरवातीची किंमत म्हणजे ओपन प्राईस होय.
२. क्लोझ प्राईस (शेवटची किंमत/Close Price)
शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची अगदी शेवटची किंमत म्हणजे क्लोझ प्राईस होय.
३. हाई प्राईस (कमाल किंमत /High Price)
शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची कमाल किंवा सर्वाधिक किंमत म्हणजे हाई प्राईस होय.
४. लोव प्राईस (किमान किंमत /Low Price)
शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची किमान किंवा सर्वात कमी किंमत म्हणजे लोव प्राईस होय.
५. स्प्रीएड (Spread)
ठरलेल्या कालावधीसाठीची कमाल किंमत आणि किमान किंमत यातील फरक म्हणजे स्प्रीएड होय
६.वीक (Wick)
शेअरच्या हाई प्राईस आणि क्लोझ / ओपन प्राईस मधील फरक म्हणजे वीक.
सोबतच्या कॅण्डलस्टीक्समध्ये तुम्हाला कॅन्डलची ची जी शेंडी दिसतेय ना ती शेंडी म्हणजे वीक.
७ टेल(Tail)
शेअरच्या लोव प्राईस आणि क्लोझ / ओपन प्राईस मधील फरक म्हणजे टेल.
सोबतच्या कॅन्डलची तुम्हाला जी शेपटी दिसतेय ना ती शेपटी म्हणजे टेल.
कॅन्डलच्या वीक आणि टेलला अनेक जण कॅन्डलच्या शॅडो असे देखिल म्हणतात.
गोंधळ टाळण्यासाठी मी सर्व ठिकाणी वरच्या शॅडोला – वीक आणि खालच्या शॅडोला – टेल असे म्हटले आहे
६ बॉंडी (Body)
कॅण्डलच्या ओपन आणि क्लोज प्राईस मधील फरक म्हणजे कॅण्डलची बॉडी होय
७. रंग
कॅण्डलस्टिक्स चार्ट वर कॅण्डलचे फक्त २च रंग असतात लाल आणि हिरवा.
लाल रंगाची कॅण्डलअसे सांगते कि ठरलेल्या काळात शेअरची किंमत हि कमी झाली आहे याउलट हिरव्या रंगाची कॅण्डल असे सांगते कि शेअरच्या किमतीत वाढ झाली
लाल कॅण्डल हि मंदी तर हिरव्या रंगाची कॅण्डल तेजी दाखवते.
आता आपण कॅण्डल तयार होताना शेअरच्या किमतीत हालचाल कशी होते ते बघूया जेणेकरून आपल्याला कॅण्डल कशी तयार होते ते अधिक स्पष्ट होईल.
कॅण्डल आणि किंमतीची हालचाल | Candlestick and Price Action
आपण आता कॅण्डल कशी तयार होते ते बघणार आहोत.
वरील चित्रात रेषांच्या माध्यमातून शेअरच्या किमतीची हालचाल दाखविली आहे व या हालचालींमुळे तयार होणारी कॅण्डल सोबत दाखविली आहे
१. हिरवी कँडल (ग्रीन कँडल / Green Candle )
अ. शेअरची किंमत ओपन झाली व खाली घसरली
ब . त्यानंतर शेअरची किंमत वाढत गेली आणि ओपन प्राईस पेक्षासुद्धा अधिक झाली
क .आणि शेअरची किंमत हि ओपन प्राईस पेक्षा अधिक किमतीला क्लोज झाली.
शेअरच्या शेवटच्या किमतीला आपण क्लोज प्राईस असे म्हणतो थोडक्यात काय तर शेअरची क्लोज प्राईस हि ओपन प्राईस पेक्षा अधिक असल्यास हिरव्या रंगाची कॅण्डल तयार होते
२. लाल कँडल (रेड कँडल /Red Candle )
अ. शेअरची किंमत ओपन झाली व ओपन प्राईस पेक्षासुद्धा अधिक झाली
ब त्यानंतर मात्र शेअरची किंमत कमी होत गेली आणि ओपन प्राईस पेक्षासुद्धा कमी झाली
क. आणि शेअरची किंमत शेवटी हि ओपन प्राईस पेक्षा कमी किमतीला क्लोज झाली
आता आपण कॅन्डल आणि कॅन्डल तयार होतांना झालेल्या किमतीच्या हालचालींचे उदाहरण बघूया.
खालील चित्रात हिरवी आणि लाल अशा दोन कॅण्डल दाखवल्या आहेत.
आपण असे समजूया कि या दोन्ही कॅण्डल या एका दिवसाच्या कॅण्डल आहेत याचाच अर्थ असा कि डेली कॅण्डल आहेत.
शेअरच्या किमतींना शेअर मार्केटच्या भाषेत प्राईस असे म्हणतात तेव्हा यापुढे शेअरच्या किमतीचा उल्लेख मी शेअरची प्राईस असा केला आहे.
हिरवी कॅण्डल :
मार्केट खुले होताच शेअरची प्राईस १०० रुपयांना ओपन झाली आणि ९० रुपयांपर्यंत खाली घसरली.
काही वेळानंतर शेअरची प्राईस वाढून १४० रुपयांपर्यंत गेली.
मार्केट बंद होताना शेअरची प्राईस १४० रुपयांहुन थोडी कमी होऊन १३० रुपयांपर्यंत घसरली आणि १३० रुपये हिच शेअरची क्लोझ प्राईस राहिली.
लाल कॅण्डल:
मार्केट खुले होताच शेअरची प्राईस १३० रुपयांना ओपन झाली आणि १४० रुपयांपर्यंत वाढली
काही वेळानंतर शेअरची प्राईस ९० रुपयांपर्यंत कमी झाली.
मार्केट बंद होताना शेअरची प्राईस ९० रुपयांहुन थोडी वाढून १०० रुपयांपर्यंत वाढली आणि १०० रुपये हिच शेअरची क्लोझ प्राईस राहिली.
अशाप्रकारे जर शेअरची क्लोज प्राईस हि ओपन प्राईस पेक्षा कमी असल्यास लाल रंगाची कॅण्डल तयार होते.
हिरव्या कॅण्डलला शेअर बाजाराच्या भाषेत ‘बूलीश कॅण्डल’ तर लाल कॅण्डलला ‘बेअरिश कॅण्डल’ असे म्हणतात.
शेअर बाजारात विविध कॅण्डल तयार होण्यामागे कारणीभूत असते ती त्या शेअरविषयीची बाजारातील मानसिकता होय.
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी आपल्याला बाजाराची मानसिकता (सेंटीमेंट /sentiment ) ओळखता येणे खूप गरजेचे.
कसं बरं कळणार आपल्याला बाजाराच्या मनात आहे तरी काय ?
समजून घ्यायचंय ?
पुढे वाचत रहा …
शेअर बाजारातील मानसिकता (सेंटीमेंट /sentiment ) आणि कॅन्डलस्टिक्स | Market Sentiments and Candlesticks
शेअर बाजाराची किंवा शेअरची चाल ओळखण्यासाठी आपल्याला मदत होते कॅन्डलच्या वीकची, बॉडीची आणि टेलची.
-वीक (Wick)
जर कॅण्डलला मोठी शेंडी/वीक असेल तर समजायचं कि बाजारात मोठे विक्रेते असून विक्रीचा दबावदेखील जास्त आहे.
विक्रीचा दबाव म्हणजेच शेअर मार्केटच्या भाषेत सेलिंग प्रेशर होय.
याउलट वीक जर लहान असेल म्हणजेच बॉडी वर जाऊन क्लोज होत असेल तर बाजारात मोठे विक्रेते नसून विक्रीचा दबाव कमी आहे.
चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कॅण्डलस्टिक चार्टवर विविध कॅण्डल आणि कॅण्डलच्या वीक बघायला मिळू शकतात.
सोबत दिलेल्या चित्रावरून आपल्याला तेजीमुळे तयार होणारी कॅण्डल आणि तिच्या तयार होण्यामागील मानसिकता अधिक स्पष्ट होईल.
सर्वात डावीकडील कॅण्डल बाजारात सर्वात जास्त तेजी असल्याचे दाखवते तर सर्वात उजवीकडील कॅण्डल बाजारात सर्वात जास्त मंदी असल्याचे दाखवते
एखाद्या शेअरच्या कॅण्डलला असणारी वीक हे दाखवते कि बाजारात वरच्या किमतीला खरेदी करण्याची मानसिकता किंवा तयारी आहे कि नाही.
वीक(Wick) तयार होते म्हणजे काय तर शेअरची किंमत वर गेली होती पण जास्त किमतीला शेअरची किंमत टिकाव धरू शकली नाही म्हणजे बाजार असे म्हणतो कि शेअरची हि किंमत अवाजवी (ओव्हरप्राइस्ड /Over-priced ) आहे आणि म्हणून मग शेअरची किंमत पुन्हा खाली घसरते.
आता आपण कॅन्डलची टेल आपल्याला काय सांगते ते बघूया.
–शेपटी(टेल /Tail )
जर कॅण्डलला मोठी शेंडी/टेल असेल तर समजायचं कि बाजारात मोठे खरेदीदार असून खरेदीचा दबावदेखील जास्त आहे.
खरेदीचा दबाव म्हणजेच शेअर मार्केटच्या भाषेत बायिंग प्रेशर होय.
खालील चित्रातील कॅण्डल बाजारातील तेजीच्या चढत्या क्रमाने आहेत.
चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कॅण्डलस्टिक चार्टवर विविध कॅण्डल आणि कॅण्डलच्या टेल बघायला मिळू शकतात.
सर्वात डावीकडील कॅण्डल बाजारात सर्वात जास्त मंदी असल्याचे दाखवते तर सर्वात उजवीकडील कॅण्डल बाजारात सर्वात जास्त तेजी असल्याचे दाखवते.
एखाद्या शेअरच्या कॅण्डलला असणारी शेपटी(टेल /Tail ) हे दाखवते कि बाजारात खालच्या किमतीला खरेदी करण्याची मानसिकता किंवा तयारी आहे कि नाही.
टेल /Tail तयार होते म्हणजे काय तर शेअरची किंमत खाली घसरली होती पण बाजारात असे मत आहे कि शेअरची किंमत हि कमी (अंडरप्राइस्ड /under-priced )आहे आणि म्हणून मग ती वरती जायला सुरुवात होते
वरील ‘टेल आणि विक‘ चे विश्लेषण जरी योग्य असले तरी तयार होणारी कॅण्डल हि चार्टवर कुठे तयार होते याला फार महत्व असून त्यानुसार ‘वीक आणि टेल‘ च्या गुपित अर्थाचा उलगडा करायचा असतो
-बॉडी(Body)
चार्टवर तयार होणाऱ्या कॅण्डल्सची बॉडी जितकी मोठी बाजाराचा कल त्यादिशेने तितकाच जास्त असतो.
जसे कि उंच हिरवी कॅण्डल म्हणजे बाजारात खूप तेजी आहे तर ठेंगणी हिरवी कॅण्डल म्हणजे बाजरात तेजी तर आहे पण तिचे प्रमाण अतिशय कमी आहे.
याउलट उंच लाल कॅण्डल म्हणजे बाजारात खूप मंदी आहे तर ठेंगणी लाल कॅण्डल म्हणजे बाजरात मंदी तर आहे पण तिचे प्रमाण अतिशय कमी आहे.
खालील चित्रात कॅन्डलच्या बॉडी चे प्रमाण उतरत्या व चढत्या क्रमाने दाखविले आहे.
मित्रांनो, अशाप्रकारे कॅण्डल्स बॉडी, वीक, टेल, रंग, स्प्रीएड,प्राईस अशा विविध गोष्टींतून आपल्याशी सवांद साधत असतात.
एकदा का तुम्हाला कॅण्डल्सची हि भाषा अवगत झाली कि शेअर बाजारातून पैसे कमावण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही
आपण इतर लेखांत कॅण्डल्सचा उपयोग ट्रेडिंग साठी कसा करायचा ते बघणारच आहोत तेव्हा तुम्हाला कॅण्डल्स आपल्याशी कशा बोलतात ते अधिक स्पष्ट होईल.
आपण या लेखात कँडलस्टिक चार्ट्स आणि कँडलस्टिक म्हणजे काय, कँडलस्टिक चे जनक कोण, कँडलस्टिक कशी तयार होते, कँडलस्टिकचे मुख्य २ प्रकार आणि किमतीची हालचाल अशी विस्तृत माहिती घेतली
आपल्याला शेअर मार्केट, टेकनिकल ॲनालिसिस किंवा कॅन्डलस्टिक विषयी काहीही शंका असल्यास खाली कमेंट करून मला जरूर कळवा, मी आपल्या शंका दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी आभारी आहे!
कॅन्डलस्टिक विषयी अधिक माहितीसाठी खालील लेख जरूर वाचा
धन्यवाद!!!
- हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
- एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Engulfing Candlestick Pattern in Marathi
- डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi
- पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi
- बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern
- बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi
- कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi
- शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi
- थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi
- थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi
- मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi
- इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Evening Star Candlestick Pattern in Marathi
- बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi
Mahiti sadhi, saral Ani sopi ahe.